शहरासह जिल्ह्यात डेंग्यूची साथ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:00 PM2019-10-06T12:00:30+5:302019-10-06T12:00:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण अद्यापही आढळून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ डेंग्यूसदृश तापाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण अद्यापही आढळून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून तपासणी मोहिम राबवण्यात येत आह़े
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात नवापुर, नंदुरबार आणि शहादा शहरात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने 259 रुग्णांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले होत़े यात आठ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले होत़े त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्याची माहिती आह़े परंतू यानंतरही रुग्ण आढळून येण्याची माहिती सातत्याने समोर येत असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हिवताप विभाग यांच्याकडून संयुक्तपणे जनजागृती करण्यावर भर दिला जात आह़े
दरम्यान ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव चिंता वाढवणारा असल्याची माहिती देण्यात आली आह़े
आरोग्य विभागाकडून जनजागृती होत असल्याचे सांगण्यात आले असले तरी रुग्ण समोर येणे थांबत नसल्याचे दिसून आले आह़े प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये तापाचे रुग्ण दाखल असल्याने आरोग्य यंत्रणेने त्यांच्या तपासण्या करुन कारवाई करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आह़े
ठिकठिकाणी स्वचछता करण्याबाबत अद्यापही उदासिनता असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत़