26 पैकी 17 उमेदवारांचे डिपॉङिाट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:11 PM2019-10-27T12:11:51+5:302019-10-27T12:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाच्या एकाही उमेदवाराची डिपॉझीट जप्त झाली नाही. असे असले तरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाच्या एकाही उमेदवाराची डिपॉझीट जप्त झाली नाही. असे असले तरी 26 पैकी तब्बल 17 उमेदवारांना आपल्या डिपॉङिाटवर पाणी सोडावे लागणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवाराला अनामत रक्कम जमा करावी लागते. निवडणुकीत आयोगाच्या नियमानुसार ठराविक मतदान न मिळाल्यास ही रक्कम आयोग जप्त करतो. त्यालाच उमेदवाराची डिपॉझीट जप्त होणे असे म्हटले जाते. चार मतदारसंघात यंदा 26 उमेदवार रिंगणात होते. पैकी केवळ नऊ जणांची डिपॉङिाट सुरक्षीत राहिली. जप्त झाली आहे.
पाच हजाराची रक्कम
जिल्ह्यातील चारही मतदार संघ हे एस.टी.प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी केवळ पाच हजार रुपये इतकी डिपॉङिाट आहे. सर्वसाधारण मतदारसंघात हीच रक्कम दहा हजार इतकी असते. उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच ही रक्कम रोख स्वरूपात भरावी लागते.
केंव्हा होते डिपॉङिाट जप्त
विधानसभा निवडणुकीत एकुण झालेल्या मतदानापैकी उमेदवाराला एक षष्टांश इतकी मते घेणे आवश्यक आहे. अर्थात जर एखाद्या मतदारसंघात एक लाख मतदान झाले असेल तर उमेदवाराला किमान 16 हजार 666 इतकी किंवा त्यापेक्षा अधीक मते घेणे आवश्यक आहे. अन्यथा डिपॉङिाट जप्त होत असते.
17 जणांची होणार जप्त
यंदा झालेल्या निवडणुकीत एकुण 17 उमेवारांना एक षष्टांश पेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येकी पाच हजार डिपॉङिाट जप्त होणार आहे. ही रक्कम एकुण 85 हजारार्पयत इतकी आहे.
कुणाकुणाची जप्त होणार
चारही मतदारसंघात एकाही मोठय़ा राजकीय पक्षाच्या उमेदवाराची अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना या मोठय़ा पक्षांच्या उमेदवारांची डिपॉङिाट जप्त झाली नाही. दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, माकप, भारतीय ट्रायबल पार्टी आदींसह इतर लहान मोठय़ा आणि अपक्ष उमेदवारांची डिपॉङिाट जप्त झाली आहे. त्यात नंदुरबार मतदार संघात वंचीतच्या दीपा वळवी, बसपाचे विपूूल वसावे, स्वाभीमानी पक्षाचे अॅड.प्रकाश गांगुर्डे, अपक्ष आनंदा कोळी यांचा समावेश आहे. नवापूर मतदारसंघात भारतीय ट्रायबल पार्टीचे डॉ.उल्हास वसावे, वंचीतचे जगन गावीत, आम आदमी पार्टीचे डॉ.सुनील गावीत, पिपल्स पार्टीचे रामू वळवी, अपक्ष अॅड.राकेश गावीत, अॅड.प्रकाश गांगुर्डे, अजरूनसिंग वसावे यांचा समावेश आहे.
अक्कलकुवा मतदारसंघात भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी, आपचे कैलास वसावे, भारतीय ट्रायबल पार्टीचे संजय वळवी, अपक्ष भरत पावरा तर शहादा मतदारसंघात अपक्ष जेलसिंग पावरा व माकपचे जयसिंग माळी यांचा समावेश आहे.