नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत उदासिनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:21 PM2017-10-15T12:21:41+5:302017-10-15T12:21:41+5:30
परतीच्या पावसाचा फटका : शेतकरी हवालदिल, लाखोंचे नुकसान
नंदुरबार : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अनियमित पावसामुळे यंदा उत्पादकता घटलेली असतांना आता हातातोंडाशी आलेला घास देखील लहरी निसर्गाने हिरावल्याने शेतक:यांमध्ये चलबिचलता निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवार्पयत महसूल कर्मचा:यांचा संप सुरू होता, त्यामुळे पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते.
यंदा परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. गेल्या आठवडय़ापासून अनेक भागात कमी अधीक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक असतांना आठ दिवस होण्यात आले तरी पंचनाम्यांबाबत काहीही हालचाली नसल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर अखेर सरासरी 89 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच टक्के पाऊस अधीक आहे. असे असले तरी अनियमितता आणि काही भागातच पावसाचा अधीक जोर यामुळे अनेक भागात खरीपाची स्थिती वाईट होती. त्यामुळे विविध पिकांची उत्पादकता देखील कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेता शेतक:यांनी जेमतेम नियोजन केलेले असतांनाच परतीचा पावसाने ते नियोजन देखील आता कोलमडले आहे.
जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक अर्थात 80 हजार हेक्टर र्पयत आहे. त्यामुळे परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका हा कापूस या पिकाला बसला आहे. वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाला. परिणामी त्या कापसाची प्रतवारी देखील कमी झाली. त्याचा फटका भाव कमी होण्यात झाला.
हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच चार हजारार्पयत भाव खेतिया बाजार समितीत मिळाला होता. स्थानिक ठिकाणी देखील याच भावात कापूस खरेदी केली जात होती. परंतु पावसात भिजल्यामुळे कापूस तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत घसरला आहे. याशिवाय काढणीवर आलेल्या भाताचेही नवापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, उडीद या पिकांनाही फटका बसला आहे.
वादळवारा आणि जोरदार पाऊस यामुळे पपई आणि केळीचेही नुकसान शहादा व नंदुरबार तालुक्यात झाले आहे. यामुळे शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते नुकसान भरून काढणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.
पंचनामे तातडीने करावे
नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी विविध भागातील शेतक:यांनी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेध शाळेने पावसाचा अंदाज 14 ऑक्टोबर्पयत वर्तविला होता. त्यामुळे पंचनामे लांबल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय महसूल कर्मचा:यांच्या संपामुळे देखील पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. सोमवारपासून पंचनामे सुरू होणार असून तातडीने अहवाल राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे.