उपजिल्हाधिका:यांच्या सहा रिक्त पदांमुळे प्रशासन ‘गार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:50 PM2019-06-08T12:50:55+5:302019-06-08T12:51:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या तीन वर्षात गतीमान झालेले प्रशासन गत 15 दिवसांत थंडावले आह़े जिल्ह्यात काम करणा:या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या तीन वर्षात गतीमान झालेले प्रशासन गत 15 दिवसांत थंडावले आह़े जिल्ह्यात काम करणा:या सहा उपजिल्हाधिका:यांच्या इतरत्र बदल्या झाल्यानंतर त्यांच्याजागी अधिकारीच नियुक्त नसल्याने प्रशासकीय कामकाजावर प्रचंड ताण निर्माण झाला आह़े विशेष म्हणजे येत्या काळात निवडणूका असल्याने रिक्त पदे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आह़े
महसूल विभागासह एकूण 11 विभागांचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बदल्यांचा हंगाम सुरु आह़े यातच 31 मे रोजी लिपिकवर्गीय, अव्वल कारकून, नायब तहसीलदार आणि तहसीलदार संवर्गातील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल़े यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली होती़ यात बदल्यांमुळे भर पडली असून सरदार सरोवर प्रकल्प, पुनवर्सन विभाग, गा:हाणे निराकरण, पुरवठा विभाग आणि रोजगार हमी याठिकाणी कामकाजावर सर्वाधिक परिणाम झाला आह़े अधिका:यांच्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे येथे विभागीय आयुक्त आणि मुख्य सचिव यांच्याकडे याबाबत प्रस्ताव दिल्याची माहिती आह़े
येत्या काही दिवसात जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची अधिसूचना काढली जाणार असल्याने अधिका:यांच्या नियुक्त्या गरजेच्या झाल्या असल्याचे प्रशासकीय वतरुळातून सांगण्यात येत आह़े तूर्तास सहा उपजिल्हाधिकारी नसल्याने त्यांचा पदभार इतर विभाग प्रमुखांना सोपवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला आह़े
विशेष म्हणजे जिल्ह्यात चालू महिन्यात राज्यपालांच्या दौ:याची चर्चा आह़े रिक्त पदे कायम राहिल्यास अधिका:यांना प्रशासकीय कामकाज करणे अवघड होणार आह़े
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनवर्सन अधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प विभाग नंदुरबार, ससप्र तळोदा, गा:हाणे निराकरण प्राधिकरण आणि रोजगार हमी योजना अशा सहा विभागांना उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नाहीत़ त्यांच्या जागी नियुक्त असलेले अधिकारी बदलून गेले आहेत़ तत्कालीन रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे यांच्या बदलीनंतर याठिकाणी अधिकारी नियुक्त झालेले नाहीत़ ससप्रचे उपजिल्हाधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत़ तर उर्वरित चार अधिका:यांची बदली झाली आह़े हे सर्व विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असून सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत दर दिवशी बाधितांच्या समस्या पुढे येत असताना त्याच्या निगडीत तीन उपजिल्हाधिकारी नसल्याने बाधितांसह येथे नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचा:यांच्याही अडचणींमध्ये वाढ होत आह़े परजिल्ह्यातून अधिकारी बदलून येण्याआधीच येथील अधिका:यांच्या बदल्या झाल्या आहेत़ जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारांची 3 पदे रिक्त आहेत़ तसेच नायब तहसीलदारांची 8 पदे रिक्त झाल्याने महसूली कामांचा बोजा वाढल्याचे सांगण्यात येत आह़े शासनाकडून जिल्ह्यात अधिकारी पाठवण्याबाबत स्विकारलेल्या नकारात्मक धोरणामुळे नागरिकांचीही गळचेपी होत आह़े
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारुप याद्यांचे तालुकस्तरावर शुक्रवारी प्रकाश करण्यात आले आह़े 16 जून रोजी याद्या अंतीम होणार आहेत़ यानंतर 20 किंवा 22 जून रोजी जिल्हा परिषद निवडणूकीची अधिसूचना निघणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासाठी सहा तालुक्यासाठी सहा उपजिल्हाधिकारी लागतील़ तूर्तास तीनच अधिकारी कार्यारत असल्याने उर्वरित तालुक्यांचे कामकाज करणार कोण, असा प्रश्न आह़े सध्या निवासी उपजिल्हाधिकारी, प्रशासन आणि निवडणूक असे तीनच उपजिल्हाधिकारी नंदुरबार प्रशासनात आहेत़ त्यांच्याकडे प्रत्येकी चार विभागांचा कार्यभार असल्याने कामाचा बोजा वाढला आह़े यातून गतीमान झालेले प्रशासन कासवगतीने चालत आह़े