सर्व सुविधा असूनही लालपरीची प्रतिक्षा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:38 PM2019-08-04T13:38:59+5:302019-08-04T13:39:04+5:30
शहादा : तालुक्यातील अभानपूर हे गाव नंदुरबार जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गाव असून, शहादा तालुक्यातील हिंगणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर ...
शहादा : तालुक्यातील अभानपूर हे गाव नंदुरबार जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गाव असून, शहादा तालुक्यातील हिंगणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर धुळे व नदुबार जिल्हाच्या सिमेवर वसले आहे. गावात पक्के रस्ते झाले आहेत. मात्र या गावाला अद्यापर्पयत महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस गेलेली नाही. गावात सर्व सोयीसुविधा आहेत. परंतु काही कामानिमित्त जायचे म्हणाले की, चार ते पाच किलोमीटर शिरपूर व शहादा हायवेर्पयत पायी चालत जावे लागते.
पूर्वीपासून मेंढपाळ व रोजंदारी करणारी लोक, काही काळानंतर तरुणपिढी उपजीविकेसाठी बाहेर पडली आणि हि:याला पैलू पाडण्याचे व गलाई व्यवसाय करू लागले. ती पिढी शिक्षणापासून वंचित राहिली. पण त्यांनी केलेल्या व्यवसायामुळे निदान त्यांची मुले तरी शिकली सध्या परिसरात वैयक्तिक विकासात अभानपूर गाव अव्वल आहे.
या गावामध्ये सर्व सुखसोयी आहेत. परंतु या गावात अद्यापर्पयत बससेवा नाही. विद्युतीकरण, रस्ते डांबरीकरण झाले. तसेच राहण्यासाठी बंगले ही बांधण्यात आले. येथील तरुण व्यवसायासाठी बाहेर पडल्याने हातात पैसा येऊ लागल्याने अभानपूर गावाचे दारिद्रय़ हटले. मात्र बस गावात कधी येईल असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
शहादा-शिरपूर हायवेपासून पाच किलोमीटर अंतरावर गाव वसले असून, या गावाची लोकसंख्या 650 च्या जवळपास आहे. तरी या गावात बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे