इमारत असूनही पाण्याची सुविधा नाही : नंदुरबार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:43 PM2018-01-23T12:43:36+5:302018-01-23T12:43:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले आह़े परंतु येथे पाण्याची सुविधा नसल्याने हे वसतिगृह धुळखात आह़े परिणामी विद्यार्थिनींना वसतिगृह असतानाही इतरत्र जादा घरभाडे देऊन रहावे लागत आह़े
येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्याथ्र्यासाठी असलेल्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आह़े शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असताना येथील इमारती तसेच कॉलेज कॅम्पसची स्थिती भुताटकी इमारती सारखी झाली आह़े या ठिकाणी 2009 मध्ये महाविद्यालयाचे बांधकाम करण्यात आले होत़े त्यानंतर सुमारे पाच वर्षानी येथे मुलींसाठी वसतिगृहदेखील बांधण्यात आले आह़े
62 खोल्यांचे असलेले हे वसतिगृह गेल्या अनेक वर्षापासून तसेच पडून आह़े या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने वसतिगृहाचा वापर निरुपयोगी वस्तू ठेवण्यासाठीच करण्यात येत असल्याचे दिसून येत आह़े या वसतिगृहाच्या भोवताली डोक्याबरोबर झुडपे वाढले आह़े तसेच वापरात नसल्याने धुळीचेही साम्राज्य निर्माण झालेले आह़े कॉलेज कॅम्पसमध्ये सुमारे चार कुपनलिका करण्यात आल्या आह़े परंतु वसतिगृहाच्या परिसरात कुपनलिकांना पाणी लागत नसल्याने या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत आह़े तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विविध जिल्ह्यातून विद्यार्थिनी येत असतात़ त्यामुळे शासनाकडूनही याची दखल घेत त्यांच्यासाठी वसतिगृह बांधण्यात आले होत़े परंतु त्याआधी पाणी, वीज, विद्यार्थिनींची सुरक्षितता या मुलभूत गोष्टींचे नियोजन होणे आवश्यक होत़े
परंतु तसे झाले नाही़ परिणामी लाखो रुपयांचे वसतिगृह बांधूनदेखील विद्यार्थिनींना परिसरात भाडय़ाने रुम घेऊन जादा घरभाडे मोजावे लागत असल्याच्या व्यथा विद्यार्थिनींकडून मांडण्यात येत आह़े
परिसरात अनेक नागरिकांकडून विद्याथ्र्यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने घरे बांधण्यात आली आह़े विद्याथ्र्याना भाडय़ाने रुम देण्याचा व्यवसायदेखील अनेक रहिवाशांकडून सुरु करण्यात आला आह़े परंतु विद्यार्थी संख्या जास्त झाल्यास अनेक घर मालकांकडून ही संधी हेरत घरभाडे वाढविण्यात येत असत़े त्यामुळे अनेक विद्याथ्र्याची आर्थिक पिळवणूकदेखील होत असल्याचा आरोप करण्यात आला आह़े यात विद्यार्थिनींची व्यथा अधिकच बिकट आह़े विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाकडून वसतिगृह बांधण्यात आले असूनही ते वापरात नसल्याने आपल्या हक्काच्या सोयी-सुविधांपासून त्यांना वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करुन पाण्याची व्यवस्था करुन त्वरीत वसतिगृह वापरास खुले करण्याची अपेक्षा आह़े