नोटिसा बजावूनही मोकाट गुरांचा त्रास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:25 PM2018-03-13T13:25:50+5:302018-03-13T13:25:50+5:30
शेतकरी संतप्त : तळोदा शहरालगतच्या शेतांमधील पिकांचे नुकसान
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 13 : मोकाट फिरणा:या गुरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेने पशुपालकांना चार दिवसांपूर्वी नोटीसा बजावूनही पालिकेच्या नोटीसींची दखल घेण्याऐवजी त्यास केराची टोपली दाखवत सर्रास शेतक:यांच्या पिकांचे नुकसान ही गुरे करीत असल्याची तक्रार शेतक:यांनी केली आहे. दरम्यान, एका शेतक:याने आपल्या उभ्या पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
मोकाट गुरे व वराहांमुळे शहरालगतच्या शेत शिवारातील शेतक:यांचा ऊस, केळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतक:यांनी पालिकेकडे केली होती. या पाश्र्वभूमिवर नगर पालिकेने चार ते पाच दिवसांपूर्वी शहरातील 25 वराह व पशुपालकांना गुरे व वराहांच्या बंदोबस्ताबाबत नोटीसी बजाविल्या होत्या. या शिवाय नोटीसीचा खुलासा तातडीने करण्याची सूचनादेखील या नोटीसीमध्ये केली होती. पालिकेच्या नोटीसीची तातडीने दखल घेण्याऐवजी सदर पशुपालकांनी या नोटिसीला केराची टोपली दाखविली असल्याचे चित्र आहे. कारण अजूनही ही मोकाट गुरे सर्रास शेतक:यांच्या शेतातील ऊस पिकाचे नुकसान करीत असल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी शहारतील मित्तलकुमार रामा टवाळे या शेतक:याने आपल्या अक्कलकुवा रोडवरील शेतातील उसाचे पिकाचे नुकसान मोकाट गुरांमुळे होत असल्याची तक्रार तळोदा पोलीस ठाण्यात केली आहे. एवढेच नव्हे तर या मोकाटगुरांचे पशुपालक मालकांबरोबरच रखवालदारासदेखील मारण्याची धमकी देत असतात. या प्रकरणी पशुपालकांचा बंदोबस्त करण्या ऐवजी पोलिसांनीदेखील साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहससे.
ऊस, केळी ही शेतक:यांची बारमाही पिके आहेत. त्याच्या संगोपनासाठी शेतकरी आर्थिक खर्चाबरोबरच प्रचंड मेहनत घेऊन वाढवित असतो. मात्र मोकाट गुरांच्या शेतातील संचारामुळे पीक उद्ध्वस्त होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी प्रचंड वैतागला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी या दोन्ही यंत्रणांनी अशा पशुपालकांपुढे अक्षरश: गुडघे टेकले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेवून संबंधितांना तंबी द्यावी, अशी शेतक:यांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतक:यांनी दिला आहे.