ट्रक टर्मिनस होऊनही नंदुरबारात जड वाहतूक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:08 PM2018-01-09T12:08:50+5:302018-01-09T12:09:00+5:30

Despite the truck terminus, heavy traffic remained in Nandurbar | ट्रक टर्मिनस होऊनही नंदुरबारात जड वाहतूक कायम

ट्रक टर्मिनस होऊनही नंदुरबारात जड वाहतूक कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ट्रक टर्मिनसचे काम पुर्ण झाल्यामुळे ते येत्या 26 जानेवारीपासून पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असली तरी शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी संयुक्तरित्या याबाबत नियोजन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वीच शहरात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत जड वाहनांना बंदी असली तरी त्याचे पालन होत नाही.
नंदुरबारातील जड वाहनांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहर वाहतुक शाळा शिस्त लावण्यासाठी प्रय}शील असली तरी शहरातील अरुंद रस्ते, त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि वाहनचालकांमध्येच स्वयंशिस्तीचा अभाव यामुळे वाहतूक शाखेलाही हात टेकावे लागतात. आता पालिकेने ट्रक टर्मिनस उभारले आहे. ते येत्या काही दिवसात पुर्णपणे कार्यान्वीत झाल्यावर शहरातील वाहतुकीची समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नंदुरबारात मोठे व्यापारी, गोडावूनमध्ये माल उतरविणारे हे सर्रास मोठी वाहने, अवजड ट्रका शहरात आणतात. अनेक व्यापा:यांचे गोडावून व होलसेलची दुकाने ही शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे नाईलाजाने अशी वाहने शहरात आणावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या नेहमीच निर्माण होते. याशिवाय लहान, मोठे अपघात देखील होतात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी होत होती.
वाहतूक शाखेचेही आदेश
वाहतूक शाखेने पाच ते सहा वर्षापूर्वी दिवसा अर्थात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली होती. परंतु अधिकारी बदलल्यानंतर आदेशही रद्द होतात किंवा बदलतात. या आदेशाचीही तीच स्थिती झाली. संबधित विभागाचे अधिकारी बदलले आणि लागलीच निर्णयही बदलला गेला. यामुळे जड वाहने सर्रास दिवसभर शहरात येतात. अरुंद रस्त्यांवर ते तासंतास रहदारीची समस्या निर्माण करतात. वाहतूक शाखेत आधीच कर्मचा:यांची संख्या कमी असल्यामुळे सर्वच ठिकाणी वाहतूक पोलीस पोहचू शकत नसल्यामुळे प्रश्न  निर्माण होतात.
ट्रक टर्मिनस तयार
शहरात पालिकेने तयार केलेले ट्रक टर्मिनस बांधून तयार आहे. त्याचा शुभारंभही करण्यात आला. परंतु काही कामे अपुर्ण असल्यामुळे ते पुर्णपणे कार्यान्वीत करण्यात आले नव्हते. आता कामे पुर्ण झाल्यानंतर येत्या 26 जानेवारीपासून ट्रक टर्मिनस पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. त्यामुळे पालिकेतर्फेच आता शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे. 
समन्वयाने अंमलबजावणी व्हावी
शहर वाहतूक शाखा आणि पालिकेने आता या आदेशाची समन्वयाने अंमलबजावणी करावी. पालिकेने सर्व गोडावून मालक, होलसेल विक्रेते आणि इतर व्यापा:यांना यासंदर्भात नोटीसा बजावून त्यांचे माल घेवून येणारे जड वाहने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेर्पयत शहरात येणार नाहीत. आल्यास दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश देणे आवश्यक आहे. वाहतूक शाखा देखील कायदेशीर कारवाई करणारच. दोघांनी समन्वयाने या आदेशाची अंमलजावणी केल्यास वाहतुकीची समस्या सुटणार आहे.
 

Web Title: Despite the truck terminus, heavy traffic remained in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.