मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत जप्त केलेले अवैध मद्य नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:18 PM2020-12-26T12:18:55+5:302020-12-26T12:19:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी :  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अवैध मद्य न्यायालयाच्या परवानगीने ...

Destroy illegal liquor seized under Molgi police station | मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत जप्त केलेले अवैध मद्य नष्ट

मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत जप्त केलेले अवैध मद्य नष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी :  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अवैध मद्य न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आले. मोलगी पोलीस ठाण्याच्या आवारात खड्डा करुन हे मद्य टाकून देण्यात आले.  जिल्हा पोलिस प्रमुख महेन्द्र पंडित, उपविभागीय पोलिस अधिकारी अ.कुवा  यांचा मागॅदशॅनाखाली तसेच अक्कलकुवा येथील कनिष्ठस्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आदेशानुसार आदेशानुसारही कारवाई करण्यात आली. यावेळी  न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक व्ही. एस. पाडवी, राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी दुय्यम निरिक्षक चोथवे, पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार तसेच दोन शासकिय पंच उपस्थित होते. या कारवाईचे व्हीडीओ चित्रीकरण करून मोलगी पोलिस ठाण्याचे मोठा खडड् खोदुन दारु नष्ट करण्यात आली. २०१६ पासून विविध ७२ गुन्ह्यात  लाखो रुपये किंमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला होता.   पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी याबाबत न्यायालयात  पत्रव्यवहार केला होता.  फौजदार महेश क्षिरसागर, सहाय्यक फौजदार घनश्याम वरसाळे, महिला काॅन्स्टेबल   सुमन पावरा, पोलिस काॅन्स्टेबल जगन पावरा,  दिनेश पावरा, देवानंद कोळी, संतोष राठोड, केशव पावरा, अमोल सिरसाठ, शुगन थोरे, कल्पेश करनकाळ आदी यावेळी उपस्थित होते. 
 

Web Title: Destroy illegal liquor seized under Molgi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.