सिलींगपूर येथे महिलांच्या पुढाकाराने मद्यसाठे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:48 PM2018-05-05T12:48:39+5:302018-05-05T12:48:39+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : व्यसनाधिनतेमुळे गावात होणारी भांडणे आणि दररोज होणा:या वादाला कंटाळलेल्या महिलांनीच दारूचे अड्डे उध्वस्त केल़े सेलींगपूर ता़ तळोदा येथे गुरूवारी सकाळी झालेल्या या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने याठिकाणी भेट देत अवैैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई केली़
तळोदा तालुक्यातील सेलिंगपूर येथे गेल्या काही महिन्यांपासून अवैैध मद्य विक्री वाढल्याने व्यसनलाधिनतेचे प्रमाणही वाढले होत़े यातून वेळोवेळी किरकोळ वाद आणि भांडणे वाढीस लागत होती़ युवकांमध्ये मद्य पिऊन भानगडी वाढल्याने काही महिन्यांपूर्वी येथील महिलांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांची भेट घेत दारूबंदीचे निवेदन आणि तसे ठरावही दिले होत़े यानंतर गावात काहीवेळी दारूबंदी करण्यात आल्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाली होती़ या प्रकाराला कंटाळलेल्या महिलांनी अशोक फत्तेसिंग ठाकरे, दिलीप मोतीराम मोरे, सुभाष भावसिंग वंजारी, गोविंदा हरसिंग ठाकरे, लोसा रूतू पाडवी, मोग्या पोहला धानका व प्रताप बाज्या पाडवी यांच्या अवैैध मद्य विक्रीच्या अड्डय़ांवर हल्लाबोल करत हातातील काठय़ांनी गावठी दारूचे मटके फोडल़े यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व इतर ग्रामस्थही होत़े महिलांच्या कारवाईनंतर मद्यविक्री करणा:यांनी येथून पळ काढला होता़ सायंकाळी उशिरा पोलीस पथकाने याठिकाणी भेट देत शांतता व सलोख ठेवण्याचे आवाहन केल़ेनवे सेलिंगपूर व जुने सेलिंगपूर येथे हातभट्टीची गावठी दारू मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात असल्याने लगतच्या गावातील मजूर सायंकाळी याठिकाणी गर्दी करत होत़े यातून गावातील शांततेचा भंग होत होता. या प्रकाराकडे लक्ष वेधत महिलांनी ग्रामसभेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी हा विषय लावून धरला होता़ यातून सरपंच रायसिंग रोडत्या मोरे, उपसरपंच रंजिताबाई दशरथ मोरे यांनी दारू बंदीचा ठराव मंजूर करत अंमलबजावणीही सुरू केली होती़ तसेच तळोदा पोलिसात गावठी दारू विक्री करणा:यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र चोरटय़ापद्धतीने मद्य विक्री करण्याचे प्रकार सुरूच होत़े यातच मद्यविक्री बंद न झाल्याने गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आसमाबाई विजय वळवी, अनिता अश्विन पाडवी, पनीना दानेल ठाकूर, कुसुमबाई देवदान ठाकूर, कुसूम विजय राऊत, रूताबाई शिमन गार्दी नितूबाई अतुल पवार यांच्यासह 50 ते 60 महिला व ग्रामपंचायत सरपंच रायसिंग मोरे, उपसरपंच रंजिताबाई दशरथ मोरे, जीवन कामा कोळी, राजेश गुज:या पवार, दशरथ काशिराम मोरे यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थांनी हातभट्टी दारू विक्री करणा:यांच्या घरी जावून त्यांची मटकी फोडत संताप व्यक्त केला़ महिलांनी पुढाकार घेत मद्याने मटके फोडत निषेध केला़