सुविधांच्या अभावाने पर्यटकांचा हिरमोड

By admin | Published: February 6, 2017 12:15 AM2017-02-06T00:15:33+5:302017-02-06T00:15:33+5:30

तोरणमाळ : विद्याथ्र्याच्या सहली व पर्यटकांची गर्दी, सोयी उपलब्ध करून देण्याची गरज

Destruction of tourists due to lack of facilities | सुविधांच्या अभावाने पर्यटकांचा हिरमोड

सुविधांच्या अभावाने पर्यटकांचा हिरमोड

Next

शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी राहते. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून अनेक कुटुंबे येतात. मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतून पर्यटक तोरणमाळ येथे येतात. आठवडय़ाच्या शेवटी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी शाळा-महाविद्यालये सहलीचे आयोजन करून विद्याथ्र्याना निसर्गरम्य वातावरण व भौगोलिक माहिती व्हावी यासाठी घेऊन येत आहेत. काही पर्यटक धुळे, नाशिक, गुजरात आदी ठिकाणांहून कुटुंबांसह येऊन या निसर्गरम्य ठिकाणी रमताना दिसून येतात.
तोरणमाळ येथील सातपायरी घाटापासूनच निसर्गाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या परिसरातील सीताखाई, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, मच्छिंद्रनाथ गुंफा, यशवंत तलाव आदी ठिकाणी पर्यटक कुटुंबांसह वनभोजनाचा आनंद घेतात. यशवंत तलावातील बोटींगमुळे बालकांसह ज्येष्ठ मंडळीही तोरणमाळला अधिक पसंती देताना दिसून येते. या नयनरम्य ठिकाणासह येथील गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना फळे, फुले विकून रोजगार उपलब्ध होत आहे.
या ठिकाणी येणा:या पर्यटकांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास अजून संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याने संबंधित विभागाने या ठिकाणी सोयी-सुविधा पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

निसर्गाने सातपुडा पर्वत रांगेत मनाला मोहून टाकेल एवढे मोठे नयनरम्य देखावे दिले आहेत. मात्र निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो.     -अनिल पाटील, पर्यटक, धुळे
महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.    -मोहित ठाकरे, पर्यटक, शहादा

विश्रांतीगृह व ओटय़ांची दुरवस्था
महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विश्रांतीगृहांची व बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओटय़ांची अवस्थाही वाईट झाली आहे. या ओटय़ाच्या फरशा निघालेल्या आहेत, पत्रेदेखील तुटलेले आहेत. परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी गाजावाजा करीत वृक्षारोपण केल्यानंतर लक्ष न दिल्याने रोपे सुकलेल्या अवस्थेत दिसून येतात.

 

Web Title: Destruction of tourists due to lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.