अट्टल घरफोडय़ास अक्कलकुव्यात अटक
By admin | Published: February 2, 2017 12:53 AM2017-02-02T00:53:59+5:302017-02-02T00:53:59+5:30
अक्कलकुवा येथे झालेल्या घरफोडीतील अनिल नरपत वसावे या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबार : अक्कलकुवा येथे झालेल्या घरफोडीतील अनिल नरपत वसावे या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीने ही कारवाई केली.
अक्कलकुवा येथील पंकज जैन यांच्याकडे 10 ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. चोरटय़ांनी घराच्या उघडय़ा दरवाजातून प्रवेश करीत कपाटातून दोन किलो चांदी, दोन तोळे सोन्याचे दागीने, 20 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने माहिती मिळविली. गुन्ह्याचा संमातर तपास करून अनिल नरपत वसावे या संशयितावर लक्ष केंद्रित केले. त्याचा ठावठिकाणा मिळूवन त्यास अक्कलकुव्यातच अटक केली. त्याच्याकडून एक किलो चांदी, सोने तसेच चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक गिरीश पाटील, सहायक निरीक्षक धनंजय पाटील, हवालदार रवींद्र लोंढे, पंढरीनाथ ढवळे, चंद्रकांत शिंदे, विकास पाटील, अनिल गोसावी, रवींद्र पाडवी, योगेश सोनवणे, दीपक गोरे, जगदीश पवार, भटू धनगर, मुकेश अहिरे, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, पुष्पलता जाधव, विकास अजगे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, किरण पावरा, राहुल भामरे, महाले, पवार, महेंद्र सोनवणे, तुषार पाटील यांनी केली.