शेतीला तंत्रज्ञानाची जोड देवून विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 11:48 AM2019-12-08T11:48:51+5:302019-12-08T11:48:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतील स्थानिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेती विकास करीत शेतकऱ्यांच्या उत्पनात भर घालण्यासाठी कवयित्री बहिणाबाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतील स्थानिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेती विकास करीत शेतकऱ्यांच्या उत्पनात भर घालण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने जिल्ह्यात सी-लेज उपक्रम सुरू केला आहे. यासाठी नवापूर तालुक्यातील चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. या कामांची पहाणी करणे आणि त्याद्वारे संशोधन करण्यासाठी मुंबईचे पथक नंदुरबारात दाखल झाले आहे.
विद्यापीठाने संशोधनाला प्राधान्य देवून त्याद्वारे विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे महत्वाचे सहकार्य मिळत आहे. शहरातून गावात हा मुख्य उद्देश असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील खांडबारा, शितलपाडा, नगाव व बालआमराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये आधीपासूनच कृषी विज्ञान केंद्र, बायफ, बीआरसी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम व कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना विविध बाबींचे मार्गदर्शन करून त्यांना समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता या कामांना मुंबईच्या १२ प्राध्यापक व २४ संशोधक विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळणार असून ते रविवारी या गावांमधील कामांची पहाणी करून अभ्यास करणार आहेत. त्यातून तयार होणाºया संशोधनातून गावांना आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी प्रयत्न होणार आहे. शेती विकासातून शेतकरी व ग्रामविकास हा प्रमुख उद्देश त्यामागे आहे. बाहेरच्या लोकांनी येवून काम करण्यापेक्षा स्थानिक लोकांनीच कामे केली पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत तेवढी बाहेरून घेतली जावी हा उद्देश देखील त्यामागे आहे.
बैठकांमधून मार्गदर्शन... मुंबईचे १२ प्राध्यपक व २४ संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारी कृषी विज्ञान केंद्रात विविध बाबींची पहाणी केली. शिवाय बैठकांमधून मार्गदर्शन देखील केले. माहितीची देवान-घेवान करण्यात आली. रविवारी हे पथक चारही गावांमध्ये जावून पहाणी करणार आहे. त्यांच्यासोबत स्थानिक शास्त्रज्ञही राहणार आहेत. शुक्रवारी पथकाने साक्री तालुक्यातील आदर्श गाव बारीपाडा येथे दिवसभर थांबून स्थानिक लोकांनी केलेल्या कृषी, जलसंधारण, पीक नियोजन याची पहाणी केली.