धडगाव तालुक्याचा जिल्ह्यासोबत संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:17 PM2019-08-05T12:17:16+5:302019-08-05T12:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आह़े शनिवारी रात्रीपासून अचानक पावसाचा जोर वाढल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आह़े शनिवारी रात्रीपासून अचानक पावसाचा जोर वाढल्याने नदीनाल्यांना पूर येऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली आह़े धडगाव तालुक्याकडे येणारे सर्व रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्हा मुख्यालयापासून तालुक्याचा संपर्क तुटला आह़े
तालुक्यात 23 जुलैपासून संततधार पाऊस सुरु आह़े यात 3 ऑगस्टपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती़ शनिवारी रात्रीत जोर वाढल्याने पालखा, राडीकलम, जर्ली येथील घरांमध्ये उदय नदीचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता़ रविवारी सकाळी उदय नदीला पूर आल्याने धडगाव ते रोझरीपाडा दरम्याच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने धडगाव पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद केली होती़ तसेच पालखा येथून पाणी आल्याने तळोदा ते धडगाव दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती़ पुराच्या पाण्यामुळे जर्ली येथील अमरसिंग पावरा यांची नदीकाठावरील शेतजमिन पिकांसह वाहून गेली़ ज्वारी आणि कापसाचे पिक वाहून गेल्याने शेतक:याचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होत़े
तालुक्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र थोरे यांच्यासह पोलीस निरीक्षक गवळी यांनी जागोजागी भेटी देत पाहणी केली़ तहसीलदार कार्यालयाकडून मंडळाधिकारी आणि तलाठी यांना तातडीने पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ प्रशासनाकडून सोमवारी पंचनामे सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े