धडगाव तालुक्यात महिलेला ‘डाकीण’ ठरवून जीवे ठार मारण्याची दिली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:13 PM2020-01-22T12:13:39+5:302020-01-22T12:13:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘तू आजवर सात माणसे खाऊन टाकली माझ्याही मुलीला जादूटोणा करुन खात आहेस’ असा आरोप ...

In Dhadgaon taluka, a woman was threatened with 'Dakin' and killed | धडगाव तालुक्यात महिलेला ‘डाकीण’ ठरवून जीवे ठार मारण्याची दिली धमकी

धडगाव तालुक्यात महिलेला ‘डाकीण’ ठरवून जीवे ठार मारण्याची दिली धमकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘तू आजवर सात माणसे खाऊन टाकली माझ्याही मुलीला जादूटोणा करुन खात आहेस’ असा आरोप करत महिलेला डाकीण ठरवून छळ केल्याची घटना धडगाव तालुक्यात उघडकीस आली़ चिखलीचा नेवाड्यापाडा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे़
रायदीबाई पोढ्या पावरा (५५) असे पिडित महिलेचे नाव असून त्या चिखली येथील रहिवासी आहेत़ १५ जानेवारी रोजी रायदीबाई ह्या चिखली गावातील अनाज्या पाडवी यांच्या शेतात काम करत असताना त्याठिकाणी बाज्या ठोबा पावरा, पिंटीबाई बाज्या पावरा, तरसिंग ठोबा पावरा आणि प्रताप ठोबा पावरा सर्व रा़ चिखली यांनी जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली होती़ चौघांनी रायदीबाई यांनी बाज्या आणि पिंटीबाई यांची मुलगी ईमला हिला हानी पोहोचवत असल्याचा दावा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ दरम्यान चौघांनी रायदीबाई यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत डाकीण असल्याचा आरोप केला होता़ घटनेनंतर घाबरलेल्या रायदीबाई यांनी गावपंचांकडे धाव घेत तक्रार मांडली होती़ पंचांनी दोन्ही कुटूंबांना समज दिली होती़ परंतू तिथे समझोता न झाल्याने अखेर रायदीबाई यांनी कुटूंबासह धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत बाज्या पावरा, पिंटीबाई , तरसिंग आणि प्रताप पावरा यांच्याविरोधात फिर्याद दिली़ चौघांविरोधात सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी विद्याकृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोेलीस नाईक साळवे करत आहेत़
दरम्यान तालुक्यात गेल्या वर्षभरात या प्रकारचे चार गुन्हे दाखल असून नवीन वर्षातील पहिल्याच गुन्ह्यामुळे तालुका हादरला आहे़

Web Title: In Dhadgaon taluka, a woman was threatened with 'Dakin' and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.