दहेज नियमनासाठी धडगावला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:46 PM2018-05-06T12:46:24+5:302018-05-06T12:46:24+5:30

Dhadgawala Sabha for dowry rules | दहेज नियमनासाठी धडगावला सभा

दहेज नियमनासाठी धडगावला सभा

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 6 : दहेजसारख्या गंभीर समस्येने ग्रस्त असलेल्या आदिवासी समाजात खर्चिक रूढी आणि परंपरांवर चर्चा करण्यासाठी धडगाव येथे दहेज नियमनासाठी सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी आठ ठराव करून अंमलबजावणीवर चर्चा झाली़ 
धडगाव येथील एस़व्ही़ठकार महाविद्यालयात झालेल्या या सभेस शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होत़े सातपुडा परिसर आदिवासी भिल्ल समाज विचारमंच यांच्याकडून या सभेचे आयोजन करण्यात आले होत़े प्रारंभी धडगाव शहरातून ढोल आणि बिरीसह पारंपरिक वाद्यांच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली़ शोभायात्रेचे उद्घाटन विजय पराडके यांच्याहस्ते करण्यात आल़े जुने धडगाव, बसस्थानक, बाबा चौक या मार्गाने ही रॅली सभास्थळी पोहोचली़  यानंतर सभास्थळी याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल़े  कार्यक्रमाचे उद्घाटन अस्तंबा येथील माकत्या महाराज यांच्याहस्ते करण्यात आल़े यावेळी अध्यक्षस्थानी सुनील पाडवी हे होत़े प्रमुख अतिथी म्हणून विजय पराडके, शिवाजी पराडके, विक्रम पाडवी, जुने धडगावचे पोलीस पाटील भिमसिंग पराडके, जामसिंग पराडके, रविंद्र पराडके, खेमा पराडके, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, माजी सभापती सी़क़ेपाडवी, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, गणेश पराडके, पंचायत समितीचे सभापती काळूसिंग पाडवी, विजय वळवी, करणसिंग वसावे, सुरेश वळवी, गौतम वळवी, सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक रूपसिंग तडवी, सुरेश वळवी, शिवलाल वळवी, शिवाजी पराडके, दिलवरसिंग वळवी, गुंजा:या पाडवी, जान्या पाडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े यानंतर दहेज प्रथेसंदर्भात  विविध ठरावांची मांडणी करून त्यांचे वाचन करण्यात आल़े या ठरावांना सातपुडय़ाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी हात उंचावून सहमती दर्शवली होती़ 
यशस्वीतेसाठी दिपक वळवी, बबन तडवी, अॅड़ छोटू वळवी, अॅड़वसंत वळवी, अॅड़ गौतम वळवी, अॅड़ विजय वसावे, सुंडय़ा पराडके यांच्यासह विचारमंचच्या युवक कार्यकत्र्यानी परिश्रम घेतल़े
 

Web Title: Dhadgawala Sabha for dowry rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.