धानोरा ग्रामिण रुग्णालयात रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:42 PM2018-01-04T12:42:40+5:302018-01-04T12:42:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जून 2017 पासून रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही रुग्णावाहिका उपलब्ध होणे इतके अवघड आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
धानोरा हे मोठय़ा लोकवस्तीचे गाव आह़े त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहेत़ येथे राहणा:या अनेक आदिवासी, गरीब ग्रामस्थांना खाजगी दवाखाने परवडणारे नसतात़ त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रांची भूमिका आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाची असत़े परंतु या ठिकाणी रुग्णवाहिकेसारखी प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
याठिकाणी रुग्णवाहिका नसल्याने धानोरा गावातील व पंचक्रोशीतील गरीब, गरजु रूग्णांना खाजगी वाहन करून जिल्हा रुग्णालयात आणावे लागत असत़े रात्री अपरात्री अपघाती रूग्ण, गंभीर रूग्ण, गरोधर महीलांच्या प्रसुतीसाठी रुग्णावाहिका ही जिवनदायीनीचे कार्य करीत असत़े अनेक वेळा रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णावाहिका महत्वाची भूमिका बजावत असत़े परंतु रुग्णवाहिकेअभावी अनेकदा वैद्यकीय अधिकारी हे नंदुरबारला पाठवत असल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात येत असतो़ येथून गुजरात राज्यदेखील जवळ असल्याने अनेकदा परराज्याचे रूग्णसुध्दा धानोरा रुग्णालयात येत असतात़ जिल्हाचे ठिकाण जवळ असल्याने आदिवासी रूग्ण धानोरा येथे प्राथमिक उपचार करून नंदुरबारला जात असता़ परंतु रूग्णवाहीका नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आह़े त्यामुळे याकडे वरीष्ठ अधिका:यांनी लक्ष देऊन तत्काळ रुग्यवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आह़े