पहिल्याच वर्षी धनपूर धरण भरले ‘तुडूंब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:34 PM2017-07-23T12:34:47+5:302017-07-23T12:34:47+5:30
कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात याचा लाभ होणार आह़े
Next
ऑ लाईन लोकमतबोरद, जि. नंदुरबार, दि. 23- 15 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तळोदा तालुक्यातील शेतक:यांचे आशास्थान असलेला धनपूर प्रकल्प ओसंडून वाहू लागला आह़े यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदले असून पहिल्याच हंगामात धरण भरल्याने येत्या काळात कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात याचा लाभ होणार आह़े निझरा नदीवर उभारण्यात आलेल्या धनपूर धरणाचे काम गेल्या दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले होत़े यंदा जून महिन्यापासून पावसाची हजेरी अनियमित असल्याने धरण भरणार किंवा नाही, यावर प्रश्न उपस्थित होत होत़े मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून कोसळणा:या पावसामुळे 21 जुलै रोजी धनपूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती देण्यात आली आह़े यानंतर या ठिकाणी भेटी देणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े पहिल्याच हंगामात ओसंडून वाहत असलेल्या या प्रकल्पाचे जलपूजन येत्या आठवडय़ात आमदार उदेसिंग पाडवी व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े धनपूर धरणात पहिल्याच हंगामात झालेल्या पाणीसाठय़ामुळे तळोदा तालुक्यातील दीड हजार हेक्टर जमिनीला अप्रत्यक्ष लाभ होणार आह़े तालुक्यातील सिंचनाची समस्या निकाली काढणा:या या प्रकल्पामुळे शेतशिवारातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पातळीत वाढ होणार असल्याचा अंदाज तालुक्यातील जाणकार शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े धरणातील जलसाठा वाढल्याने नदीकाठावरील गावांमध्ये धोक्याची सूचना करण्यात आली आह़े