नवापूर व तळोद्यात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:35 PM2020-12-05T12:35:47+5:302020-12-05T12:35:56+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर/कोठार : केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर व ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर/कोठार : केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर व तळोदा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजी करीत तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही काँग्रेसतर्फे पाठींबा दर्शविण्यात आला आहे.
नवापुरात घोषणाबाजी
केंद्र शासनाने कृषी व शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळया कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी पंजाब, हरियाणा, राज्यस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व इतर राज्यात निदर्शने व आंदोलन करीत आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुका काँग्रेस पक्षाने घेतला व त्याबाबतचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना नवापूर तालुका काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले. नवापूर तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुका काँग्रेस पक्षाने घेतला आहे. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा उपाध्यक्ष रतनजी गावीत, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, पं.स. सभापती रतिलाल कोकणी, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरीया, गटनेता आशिष मावची, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांविषयी त्यांच्या व्यथा समजून न घेता व त्यांना विश्वासात न घेता तयार केलेल्या शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊ असे म्हणणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज, थंड पाण्याचे फवारे,अश्रुधूर यासारखे अमानुष कृत्य करून शेतकऱ्यांना थांबवण्याचे षडयंत्र केले आहे. काळ्या मातीत राबणारा अन्नदाता रस्त्यावर थंडीवाऱ्यात पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या अवहेलना करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध केला आहे. पंजाब, हरियाणा व राजस्थान या तीनही राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा देत नवापूर तालुका काँग्रेस पक्ष, शेतकरी व शेतमजुरांनी निषेध केला आहे. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर तालुका कॉग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, पं.स. सभापती रतिलाल कोकणी, पं.स. सदस्या ललीता वसावे, प्रियंका गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, गटनेता आशिष मावची, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे, माजी नगरसेवक अजय पाटील, हारूण खाटीक, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरिया, फारुक शहा, सुभाष कुंभार, पराग नाईक, संजय वसावे, जयंत पाडवी, यशोदा वळवी, राजेश गावीत, विजय गावीत, मोहंमद मुल्ला, फेजल शेख, इरफान मुल्ला, रहेमत खान, तुराब पठाण, विलास वसावे, राम कोकणी आदी उपस्थित होते. निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तळोदा शहर काँग्रेस कमिटीतर्फे
धरणे आंदोलन
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेले तीन काळे कायदे रद्द करण्याच्या शेतकर्यांच्या दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तळोदा तहसील कार्यालय येथे तळोदा शहर काँग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, उपाध्यक्ष बापू कलाल, नगरसेवक सुभाष चौधरी, सत्यवान पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, अर्जुन वळवी, राणापूर येथील सरपंच दिनेश वसावे, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश इंद्रजित, जिल्हा युवा उपाध्यक्ष संदीप परदेशी, पंचायत समिती सदस्य सोनी पाडवी, जि.प.चे माजी सदस्य नरहर ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, माजी उपनगराध्यक्ष अनिल माळी, सरपंच मंगलसिंग पाटील, राजीव गांधी मुख्य समन्वयक प्रवीण वळवी, योगेश पाडवी याच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकरीविरोधी कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.