काठीच्या होळीत राजकीय ‘धुळवड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:44 PM2019-03-23T12:44:06+5:302019-03-23T12:44:11+5:30
नंदुरबार : सातपुड्यातील ऐतिहासिक काठी, ता.अक्कलकुवा येथील रजवाडी होळी यंदा ही राजेशाही थाटात साजरी झाली. या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ...
नंदुरबार : सातपुड्यातील ऐतिहासिक काठी, ता.अक्कलकुवा येथील रजवाडी होळी यंदा ही राजेशाही थाटात साजरी झाली. या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे या वेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय नेत्यांची अनोखी धुळवड पाहायला मिळाली.
काठी येथील होळी पारंपारिक पद्धतीने साजरा झाली. या होळीत रात्रभर परिसरातील भाविक परंपरागत नृत्य करीत असतात. त्यात राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या नेत्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विशेषत: नृत्य एैन रंगात आले असतांना मध्यरात्रीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी हजेरी लावली. सुमारे तासभर ते तेथे सहभागी झाले. काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांच्या सोबत त्यांनी हातात हात घेवून ढोलच्या ठेक्यावर ठेका धरत नृत्य केले. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, माजी समाजकल्यान सभापती सी.के. पाडवी हेही उपस्थित होते. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्रितपणे होळीचा लुटलेला हा आनंद सध्याच्या राजकीय पार्श्वभूमिवर लक्षवेधी ठरला. दरम्यान पालकमंत्री तेथून रवाना झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांनीही या होळीत हजेरी लावली.