खेतिया व वाघर्डे येथे ‘भोंग-या’ची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:53 PM2018-02-25T14:53:54+5:302018-02-25T14:53:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया/मंदाणे : आदिवासी बांधवांचा पारंपरिक उत्सव भोंग:या बाजार खेतिया व वाघर्डे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. होळी सणाअगोदर सातपुडय़ात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात ठिकठिकाणी भोंग:या बाजार भरविला जातो. खेतिया व वाघर्डे येथे भोंग:या बाजारानिमित्त आदिवासी बांधवांनी विविध वस्तूंची खरेदी केली. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
खेतिया येथील भोंग:या बाजारात परिसरातील सर्व सरपंचांनी एकत्र येऊन पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीस स्टेशनतर्फे झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात श्याम वास्कले यांनी भोंग:या उत्सवाचे महत्त्व सांगितले. या वेळी आदिवासी समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात रोहित चौहान व राजा चौहान यांनी ह्यशहीद भीमानायकह्ण या लघुचित्रपटात भूमिका केल्याबद्दल तर चेतन पटेल व श्याम वास्कले यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक के.एल. पाटीदार, रवी पटेल, पवन शर्मा, अनिल पाठक, रमेश चौहान, अरविंद डुडवे, वीरेंद्र रावताळे, नामदेव पटेल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-मांदळच्या तालावर आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य केले. शहरात ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. करणपुराचे सरपंच अरविंद डुडवे हे मिरवणुकीत घोडय़ावर विराजमान होते. शहरात ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व विविध वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. खेतियाच्या बाजारपेठेत दिवसभर यात्रेचे स्वरुप आले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बडवाणी जिल्ह्यात आठवडाभर विविध ठिकाणी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाघर्डे येथील भोंग:या बाजारात
100 ढोलवादक सहभागी
शहादा तालुक्यातील वाघर्डे येथे आदिवासी बांधवांचा पारंपरिक उत्सव भोंग:या बाजाराचे आयोजन करणयात आले होते. या बाजारात सुमारे 100 ढोल वादक व त्यांचे सहकारी सहभागी झाल्याने व मोठय़ा प्रमाणात दुकाने थाटण्यात आल्याने भोंग:या बाजाराला अक्षरश: यात्रेचे स्वरुप आले होते. महिलांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावून खरेदीवर भर दिल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली.
मंदाणे परिसरात सुमारे 40 ते 50 गावे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीची आहेत. तसेच मध्य प्रदेश राज्य सीमेलगत हा भाग असल्याने सीमेवरील गावेदेखील आदिवासी लोकवस्तीची असल्याने नातेवाईकांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे सीमा भागातील ठिकठिकाणी होणा:या भोंग:या बाजारात हजारो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी असते. मंदाणे भागातील यंदा पहिला भोंग:या बाजार वाघर्डे येथे भरविण्यात आला. या भोंग:या बाजारात मोठय़ा प्रमाणात लहान-मोठी दुकाने थाटण्यात आल्याने या बाजाराला यात्रेचे स्वरुप आले होते. महिला व युवतींनी विविध वस्तूंसह सौंदर्यप्रसाधने खरेदीवर भर दिल्याने मोठी आर्थिक उलाढाल झाली. वाघर्डे या गोमाई नदीच्या तिरावर वसलेल्या गावात आठवडे बाजार भरत नसला तरी आपल्या गावात आदिवासी समाजाचा पारंपरिक उत्सव भोंग:या बाजार भरविण्यात यावा यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रा.सखाराम मोते यांनी नियोजनबद्ध आखणी व जनजागृती करून सलग चौथ्यावर्षी हा बाजार यशस्वीपणे भरविण्यात आला. सुमारे 10 ते 15 हजार आदिवासी बांधव या बाजारात हजेरी लावत असल्याने अतिशय नियोजनबद्ध व शिस्तीमुळे कोणत्याही पोलीस बंदोबस्ताची गरज भासली नाही. शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात हा बाजार पार पडली. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे यांनी सहका:यांसह याठिकाणी हजेरी लावली. भोंग:या बाजार यशस्वीतेसाठी पोलीस पाटील अशोक मोते, सरपंच शारदाबाई मोते, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रा.सखाराम मोते, उपसरपंच गियान पावरा, माजी सरपंच आस्तर मोते, अमरसिंग पावरा, दशरथ मोते, काळूसिंग मोते, जालिंदर पावरा, जंगू पवार, मुन्ना मोते, राजू मोते, भगतसिंग जाधव, रेतम चव्हाण, गियान मोते, दयाराम मोते, विविध युवक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.