धुळे व नंदुरबार जिल्हा पर्यटनाचे ‘हब’ करणार : चेतक फेस्टीवलचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:12 AM2017-12-04T11:12:12+5:302017-12-04T11:12:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सारंगखेडा फेस्टीवल हा राज्यातील प्रमुख पाच फेस्टीवलमध्ये राज्यशासनाने समाविष्ट केला असून आगामी 100 वर्षे हा फेस्टीवल यशस्वीपणे साजरा होईल असा विश्वास व्यक्त करीत, पर्यटन विभागाने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकासाकडे गांभिर्याने लक्ष घातले असून हा भाग पर्यटन हब बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केल़े
सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते रविवारी शानदार उद्घाटन झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े व्यासपीठावर माजीमंत्री आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ़ कुमुदिनी गावीत, दोंडाईचाच्या नगराध्यक्ष नयनकुंवर रावल, चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपाल रावल, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधिक्षक संजय पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सरपंच भारतीबाई कोळी, रशियाच्या छायाचित्रकार कातिया डूज, जपानच्या शिष्टमंडळातील वाकायामा प्रिफेर गव्र्हमेंटचे योशियो यामाशिता, वाकायामा प्रिफेर गव्र्हमेंटच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी आणि इतर जपानी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ आदी उपस्थित होत़े यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, पर्यटन विकासाच्या माध्यमातून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा:या प्रकाशा तीर्थक्षेत्र असो, रावलापाणी असो, उनपदेव असो, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा, गजानन महाराज मंदिर, धुळ्यातील लळींग किल्ला, भामेर किल्ला असे विविध ठिकाणच्या विकासाचे कामे हाती घेण्यात आली आहेत़ तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून महाबळेश्वरच्या विकासाप्रमाणे तेथेही विकासासाठी प्रयत्न असून त्यासाठी यावर्षी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितल़े या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटनाच्या कामाला गती यावी नव्हे, तर हा भाग पर्यटन हब म्हणून नावारूपाला यावा, यासाठी पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यात आले असून लवकरच ते कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितल़े
सारंगखेडा येथील चेतक महोत्सव आगामी 10 वर्षासाठी राज्य शासनाने एका संस्थेशी करार केला आह़े तो यशस्वी झाल्यास आगामी 100 वर्ष हा फेस्टीवल सुरूच राहिल़ राज्यशासनाने कायमस्वरूपी फेस्टीवल साजरा करण्यासाठी अजिंठा फेस्टीवल प्रमाणे या फेस्टीवलचा समावेश केला असून तसा अध्यादेशही काढल्याचे त्यांनी सांगितल़े
यावेळी डॉ़ विजयकुमार गावीत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विकासाच्या कल्पना मांडल्या़ प्रसंगी हजारोंच्या संख्येने पर्यटक व यात्रेकरू उपस्थित होत़े