धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील फरशी तुटल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:32 PM2019-08-10T12:32:17+5:302019-08-10T12:32:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : संततधार व मुसळधार पावसाचा जोर तालुक्यात कायम असून रायंगण शिवारात महामार्ग क्रमांक सहावरील पुलाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : संततधार व मुसळधार पावसाचा जोर तालुक्यात कायम असून रायंगण शिवारात महामार्ग क्रमांक सहावरील पुलाची फरशी तुटल्याने महामार्गावरील वाहतूक सायंकाळी पूर्णत: बंद झाली. नागङिारी जवळच्या वजीरपाडा येथील पूल वाहून गेला तर शहरात दोन घरांची पडझड झाली.
एका दिवसाच्या अल्पशा विश्रांतीनंतर पावसाने मध्यरात्र उलटल्यानंतर पुन्हा जोरदार हजेरी लावली. संततधार व मुसळधार पावसात नागङिारीजवळील वजीरपाडा येथील पूल पुराच्या पाण्यात सकाळी सात वाजता वाहून गेला. सुदैवाने पुलावरून पाणी वाहत असताना त्यावरुन वाहनांची ये-जा नव्हती अशावेळी पूल वाहून गेला. नवापूर शहरातील शिवाजी रोडवरील जुन्या पोस्ट कार्यालय इमारतीशेजारी रमेश वाघ व नंदकिशोर थोरात यांच्या लागून असलेल्या दोन घरांची सामाईक भिंत शुक्रवारी सकाळी सात वाजता कोसळली. तेथे कुणीही राहत नसल्याने इतर हानी झाली नाही. जीर्ण झालेल्या या घराचा पहिला माळा उतरवून घेण्यासाठी पालिकेने संबंधितांना कळविले होते हे विशेष. संततधार पावसामुळे रंगावली नदीने सकाळी आठ वाजता धोक्याची पातळी ओलांडली होती. महामार्ग क्रमांक सहावरील रंगावली नदीवरील पुलावरील भागास पुराचे पाणी स्पर्श करून जात असल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरेकेटींग करुन टप्प्याटप्प्याने एकेरी वाहतूक सुरु ठेवली. नदीपात्रात पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेल्याने नदीकिनारी असलेल्या वसाहतींमध्ये काही काळ धावपळ उडाली होती. दुपारी बारानंतर पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाल्याने लोकांसह प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सायंकाळ होता होता महामार्ग क्रमांक सहा पूर्णत: बंद झाल्याची खबर आली. रायंगण शिवारात ओम साई पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ब्रिटिशकालीन फरशी लगतच्या एका भागावरील मातीचा भाग सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वाहून गेला. त्याचवेळेस एक ट्रक येथून जात होता. ट्रकच्या मध्यभागी असलेला भाग पुलावर अधांतरी झुलत होता. चालकाने प्रसंगावधान राखल्याने चालक व वाहक सुरक्षित राहिले. या घटनेमुळे महामार्ग बंद झाला. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहकारी अधिका:यांनी विसरवाडी व उच्छल पोलिसांना संपर्क साधून वाहतूक रोखण्याचे कळविले. रायंगणच्या दुतर्फा बाजूस आलेल्या वाहनांना परत माघारी फिरविण्यात आले. विसरवाडी येथून नंदुरबारमार्गे व सीमा परिवहन तपासणी नाक्यावरून पुन्हा उच्छल निझर नंदुरबारमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांना महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.