धूम स्टाईल चोरीतील 10 मंगल पोत महिलांना केली परत
By admin | Published: May 5, 2017 01:26 PM2017-05-05T13:26:56+5:302017-05-05T13:26:56+5:30
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या कर्तव्यदक्षतेबद्दल महिलांनी मानले आभार
Next
नंदुरबार,दि.5- धूम स्टाईल सोनसाखळी व पोत चोरणा:या चोरटय़ांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर दाखल गुन्ह्यातील दहा जणांना त्यांचा ऐवज पोलीस दलातर्फे परत करण्यात आला.
गेल्या काही दिवसात शहादा, तळोदा व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग अर्थात सोनसाखळी, मंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरून नेण्याचे प्रकार झाले होते. हे गुन्हे महिलांशी निगडीत असल्यामुळे पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी त्यात विशेष लक्ष घालून चोरटय़ांना जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. डहाळे व अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने गुजरातमध्ये पळून गेलेल्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 10 गुन्ह्यांमधील 22 तोळे वजनाचे पाच लाख एक हजार सहाशे रुपये किंमतीचे दागीने हस्तगत केले. जप्त करण्यात आलेले दागीने न्यायालयाकडून फिर्यादी महिलांना परत करण्याचे आदेश मिळविण्यात आले. त्यानंतर ते पोलीस अधीक्षक डहाळे यांच्या हस्ते संबधित महिलांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त केले. चोरीस गेलेले मंगळसूत्र, मंगलपोत हे आमच्या भावनांशी संबधीत विषय होते. ते पुन्हा मिळतात किंवा कसे याबाबत विवंचनेत असतांना ते परत मिळाल्याने पोलिसांवरील विश्वास वाढल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षकांनी देखील हे सर्व श्रेय स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकारी, कर्मचा:यांना जात असल्याचे सांगितले.
यावेळी अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, सहायक निरीक्षक धनंजय पाटील, हवालदार रवींद्र लोंढे, पंढरीनाथ ढवळे, चंद्रकांत शिंदे, विकास पाटील, अनिल गोसावी, रवींद्र पाडवी, योगेश सोनवणे, दीपक गोरे, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, विकास अजगे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, किरण पावरा, राहुल भामरे, महेंद्र सोनवणे, तुषार पाटील, संगिता बाविस्कर, रचना शिंदे, सुजाता जाधव, पुष्पलता जाधव, ज्योती पाटील उपस्थित होते.