जि.प.चे डिजीटलायङोशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:48 AM2019-05-31T11:48:30+5:302019-05-31T11:48:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी ङिारो पेन्डसी उपक्रम राबविला होता. त्यानुसार जुन्या अभिलेख्यांची वर्गवारी करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी ङिारो पेन्डसी उपक्रम राबविला होता. त्यानुसार जुन्या अभिलेख्यांची वर्गवारी करून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यात आली. आता जिल्हा परिषदेच्या सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंग आणि डिजीटायङोन करण्यात येणार आहे. यामुळे ई-प्रशासनाला चालना मिळणार आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून अर्थात 1998 पासून जुन्या कागदपत्रांचे निर्लेखन करण्यात आले नव्हते. यामुळे जिल्हा परिषदेची स्टोअर रूम अस्तावस्त होती. जुनी व काही महत्त्वाची कागदपत्रे शोधतांना मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेता शासनाच्या ङिारो पेन्डशी उपक्रम जिल्हा परिषदेने राबविला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासाठी विशेष काम केले. त्या त्या विभागातील कर्मचा:यांना सुटीच्या दिवशी देखील बोलावून घेत हे काम पुर्ण केले. यामुळे जुनी व अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यात आली तर अनेक अस्ताव्यस्त फाईली, कागदपत्रे यांचे नियोजनात्मक वर्गवारी करण्यात आली. यामुळे ङिारो पेन्डसीबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे काम चांगले राहिले.
आता त्या पुढील टप्पा म्हणून जिल्हा परिषद ई-प्रशासन राबविणार आहे. त्याकरीता आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणा:या या उपक्रमाअंतर्गत कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
येत्या वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंग आणि डिजीटायङोशन केले जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे कुठलेही कागदपत्र पहावयाचे असल्यास, माहिती घ्यावयाची असल्यास संगणकाच्या एका क्लिकवर ते मिळणार आहे. या कामासाठी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. साधारणत: सहा महिने ते वर्षभरात हे काम पुर्ण करण्याचे नियोजन राहणार आहे.वर्षभरात अभिलेखे स्कॅनिंग आणि डिजीटायङोशनचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.
यामुळे जिल्हा परिषदेची माहिती एकाच क्लिकवर सहज भेटणार आहे.
गेल्या वर्षी ङिारो पेन्डसी उपक्रम राबविण्यात आल्याने डिजीटायङोशनचे काम सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.
यासाठीच्या निधिची जिल्हा परिषदेने तरतूद केली आहे.