दिंडीची 51 वर्षाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:52 PM2017-09-27T12:52:47+5:302017-09-27T12:52:47+5:30

असलोद-सप्तश्रृंगी दिंडी 29 पासून : प्रकाशातील त्रिवेणी संगमावर विधी

Dindi has a tradition of 51 years | दिंडीची 51 वर्षाची परंपरा कायम

दिंडीची 51 वर्षाची परंपरा कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
असलोद : शहादा तालुक्यातील असलोद ते सप्तशृंगी गड पायी दिंडी कावड यात्रा यावर्षीदेखील काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा असलोदहून 29 सप्टेंबर रोजी वणी गडाकडे प्रस्थान करणार असल्यानेही पदयात्रा गेल्या 51 वर्षापासून अखंडितपणे सुरू असल्याने पदयात्रेला महत्त्व आले आहे.
या पायी कावड दिंडीची सुरूवात ब्रrालिन मधुसूदन पाठक (नाना बाबा) यांनी केली होती. ती अद्यापर्पयत अखंडपणे सुरू आहे. यावर्षीदेखील प्रकाशा येथील त्रिवेणी संगमावरून पवित्र तीर्थ आणून मंदिरात पूजा अर्चा करून 27 सप्टेंबर रोजी सकाळी असलोदकडे प्रयाण करणार असून, असलोदहून ही दिंडी 29 रोजी गडाकडे प्रस्थान करणार आहे. यात चिरखान, कोंढावळ, सारंगखेडा, दोंडाईचा, इंदवे, दुसाणे, साक्री, दिघावे, ताराहाबाद, विरगाव, बेज मार्गे नांदुरी गडावर सात दिवसाच्या पायी यात्रेद्वारे पोहणार आहे. 
दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी कोजागीरी पौर्णिमा असल्याने रात्री नऊ वाजता सप्तशृंगी देवीची शास्त्रोक्त व वेदोक्त मंत्रोपचारात कावडीद्वारे आणलेल्या पवित्र          तीर्थाने अभिषेक करण्यात येणार आहे.
ही पदयात्रा अतिशय नियोजन बद्ध व शिस्तीत निघत असून, यात तीन हजार पेक्षा अधिक भाविक सहभागी होत असतात. या पायी कावड दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदात्यांकडून भाविकांना सहकार्य मिळत असते. तसेच कावड पदयात्रेत भावगीत, भजन, भारूडासह            सप्तशती पाठाचे वाचन करून भाविकांमध्ये उत्साह वाढवतात. या पद यात्रींचा पोशाखा हा पांढरे धोतर, पायजमा, शर्ट व लाल रूमा असा निश्चित केला जातो. या वेळी          सहभागी होणा:या भाविकांना मंडळातर्फे विविध सूचना दिल्या जातात.
या पदयात्रेला गडावर महत्त्व प्राप्त झाले असून, पदयात्रेला शाम दिनकर जाधव यांचे विशेष सहकार्य लाभते. पदयात्रा यशस्वितेसाठी सप्तशृंगी देवी पदयात्रा सेवा मंडळाचे अध्यष धर्मा शिंदे, सचिव उद्धव पाटील, दिलीप राजभोज, भटू पाठक, जगदीश पाटीलसह मंडळाचे सदस्य प्रय}शिल राहतात.
 

Web Title: Dindi has a tradition of 51 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.