पळाशी येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:15 PM2017-11-01T13:15:14+5:302017-11-01T13:15:14+5:30

सीसीआयचा कापूस खरेदी बंदचा निर्णय

The disappointment of the farmers coming to the cotton crop at the center | पळाशी येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांची निराशा

पळाशी येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांची निराशा

Next

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयकडून खाजगी तेल व ढेप व्यापा:यांनी सरकी खरेदीस नकार दिल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आह़े यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आल़े विशेष म्हणजे हमीभाव जाहिर न करता व्यावसायिक दरांनुसार सीसीआयकडून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होती़   
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी ता़ नंदुरबार येथील कापूस खरेदी केंद्रावर 26 ऑक्टोबरपासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली होती़ प्रारंभी चार हजार 611 रूपये दर सीसीआयने जाहिर करून शेतक:यांना आकर्षित करून घेतले होत़े मात्र प्रत्यक्षात तसे कोणत्याही प्रकारचे दर न देता, चार हजार 300 पेक्षा कमी दर क्विंटलमागे देण्यात आले आहेत़ दर कमी असूनही प्रतिसाद मिळत असतानाच मंगळवारी सकाळपासून खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने, कापूस विक्रीसाठी आलेली 100 वाहने परत गेली़ यातील काहींनी जिनिंग मिलमध्ये कापूस  नेला, मात्र तेथे केवळ 4500 रूपये दर मिळाल्याने छोटय़ा शेतक:यांनी नाईलाजास्तव कापूस विक्री केली आह़े  
कापसाचे हेक्टरी उत्पादन यंदा वाढले 
नंदुरबार जिल्ह्यात यंदा एक लाख 18 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ या कापसाचे उत्पादन हेक्टरी एक हजार किलो येण्याची चिन्हे असल्याने शेतकरी समाधानी होत़े नंदुरबार बाजार समितीने परवाना दिलेल्या खरेदी केंद्रांवर गत आठवडय़ात कापूस खरेदी सुरू झाली होती़ चांगल्या आणि उच्च दर्जाचा कोरडा कापूस प्रारंभी चार हजार 600 रूपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आला होता़ परंतू दुस:या दिवसापासून दरांमध्ये 300 रूपयांची घट झाली़ याचवेळी सीसीआयने केंद्र सुरू केले होत़े मात्र सोमवारपासून सीसीआयची सरकी खरेदी करण्यास देशपातळीवरील व्यापा:यांनी नकार दिल्याने पेच निर्माण झाला़ हा पेच सोडवण्याऐवजी सीसीआयने नंदुरबारसह राज्याच्या विविध भागात सुरू असलेले कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत़ खाजगी जिनिंग उद्योगचालकांनी मंगळवारी कापूस खरेदी केला असला तरी दरांमध्ये घसरण कायम होती़ जिनिंग व्यापा:यांकडूनही तेल आणि ढेप उत्पादकांनी 1700 रूपये प्रतिक्विंटल सरकी खरेदी करण्यास प्रारंभ केल्याने येत्या काळात खाजगी जिनिंगमध्ये कापसाच्या दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता असल्याची माहिती जिनिंगचालक द्वारका अग्रवाल यांनी व्यक्त केल़े 
 

Web Title: The disappointment of the farmers coming to the cotton crop at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.