जिल्ह्यातील 80 हजार शेतक:यांना बोंडअळीची नुकसान भरपाईचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 04:23 PM2018-12-31T16:23:24+5:302018-12-31T16:23:28+5:30
नंदुरबार : बोंडअळीमुळे कापूस उत्पादनपासून मुकलेल्या जिल्ह्यातील 80 हजार शेतक:यांना जिल्हा प्रशासनाकडून नुकसानभरपाई अदा करण्यात आली आह़े तालुकास्तरावरुन शेतक:यांना ...
नंदुरबार : बोंडअळीमुळे कापूस उत्पादनपासून मुकलेल्या जिल्ह्यातील 80 हजार शेतक:यांना जिल्हा प्रशासनाकडून नुकसानभरपाई अदा करण्यात आली आह़े तालुकास्तरावरुन शेतक:यांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले आह़े
खरीप 2017 मध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांचे आर्थिक नुकसान झाले होत़े या नुकसानीनंतर शासनाकडून शेतक:यांना आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार कोरडवाहू शेतीसाठी एकरी पाच हजार तर बागायतीसाठी साडेसहा हजार रुपये अनुदान जाहिर करण्यात आले होत़े नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येऊन जिल्ह्यातील 85 हजार 895 शेतक:यांसाठी 89 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या निधीच्या वितरणाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी शुक्रवारी घेतला़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अधिक्षक कृषी अधिकारी बी़एऩपाटील, तहसीलदार नितीन पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, योगेश चंद्रे उपस्थित होत़े यावेळी 85 हजार 895 शेतक:यांना बोंडअळीच्या नुकसानीपोटी 89 कोटी 65 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ त्यापैकी 80 हजार 276 शेतक:यांना 84 कोटी 22 लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली़ उर्वरित निधी वाटपासाठी शेतक:यांचे अकाउंट नंबर घेण्यात आले असून शेतक:यांच्या खात्यात लवकरात लवकर निधी जमा केला जाईल, निधीच्या कमतरतेमुळे नंदुरबार व तळोदा तहसीलदारांनी अतिरिक्त निधीची मागणी केली असून त्यानुसार 4 कोटी 85 लाख रुपयांचा अतिरिक्त निधीचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी दिली़ निधी प्राप्त झाल्यानंतर शेतक:यांना तात्काळ वाटप करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदारांना यावेळी केल्या़