परीक्षा न दिल्यास शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाही; विजयकुमार गावित यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 02:36 PM2023-09-22T14:36:48+5:302023-09-22T14:36:59+5:30
मुलांच्या परीक्षा सोबत शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अनेक उपाय योजना राबवण्यात येतात. परंतु विद्यार्थ्यांना पाहिजे तसे शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे सोबत शिक्षकांच्यापरीक्षा देखील घ्यायचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्या विषयाच्या शिक्षकांची कमी आहे.
शिक्षक शिकवत नाही असे समजण्यास मदत होईल. यासाठी त्या विषयाचे तज्ञ बोलून त्यांच्या कडून शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या त्रुटी दूर करता येईल. यामुळे मुलांच्या परीक्षा सोबत शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आता मुलांची परीक्षा सोबतच शिक्षकांची देखील परीक्षा घेण्यात आली परंतु या परीक्षेत काही शिक्षकांनी परीक्षा दिली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांना आता परीक्षा का दिली नाही याबद्दल नोटीसा बजावण्यात येतील व नोटीसा देऊनही जर शिक्षकांनी पुन्हा परीक्षा दिली नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहे...