चर्चा बिबट्यांच्या बछड्यांची निघाले रानमांजराचे पिल्लू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:58 AM2020-10-06T11:58:51+5:302020-10-06T11:58:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार-उमर्दे रस्त्यावरील कापसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चीले गेले. सोशल मिडियावर ...

Discussion Leopard calves went wild | चर्चा बिबट्यांच्या बछड्यांची निघाले रानमांजराचे पिल्लू

चर्चा बिबट्यांच्या बछड्यांची निघाले रानमांजराचे पिल्लू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार-उमर्दे रस्त्यावरील कापसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चीले गेले. सोशल मिडियावर त्याचे फोटो टाकून ते विविध गावाच्या शिवारात आढळल्याचे सांगितले गेले. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उमर्दे रस्त्यावरील शेतात भेट दिली असता बछडे नव्हे तर ते रान मांजराचे पिलू असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण काहीसे निवळले.
उमर्दे रस्त्यावरील शेखर मराठे यांच्या शेतात रविवारी बिबट्याचे दोन बछडे आढळल्याचे बोलले जात होते. काहींनी तेथील शेतमजुराच्या हातात असलेल्या बछड्यांचे छायाचित्र घेऊन ते सोशल मिडियावर व्हायरल केले. त्याला विविध गावांची जोड देण्यात आली. जसे पुढे फॉरवर्ड होत गेले तसे गावांची नावेही बदलत गेली. आष्टे, नांदर्खे, रनाळा, खोक्राळे आदी गाव शिवार त्याला जोडण्यात आले. यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले. सद्या शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी, शेतमजूर शेतांमध्ये दिवसभर राबत आहेत. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी देखील शेतकºयांना जावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली.
ते तर रानमांजरचे पिल्लू
वन विभागाने उमर्दे शिवारातील मराठे यांच्या शेतात जाऊन पहाणी केली. तेथील शेतमजुराने पकडलेल्या पिल्लूंची पहाणी केली असता ते रानमांजराची पिल्ले असल्याचे वन विभागाचे अधिकारी मनोज रघुवंशी यांनी सांगितले.
पिल्लू लहान असतांना ते बिबट्याच्या बछड्यांसारखेच दिसते. पहातांना अनेकांची गफलत होऊ शकते. त्यामुळे जाणकार आणि वन विभागाला कळवून माहिती जाणून घेतल्यास अफवा पसरणार नाहीत असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात वावद, रनाळा, वटबारे, ठाणेपाडा जंगलात वाघसदृष्य प्राणी पाहिल्याचा दावा अनेकांनी केला आहे. परंतु वन विभागाने कधीही त्याला पुष्टी दिली नाही. बिबट्याचा संचार या भागात आहे. नर व मादी दोन्ही या भागात काही वेळा आढळून आलेली आहेत. परंतु वाघ असल्याबाबतच्या कुठलीही पदचिन्हे किंवा इतर माहिती उपलब्ध नसल्याचे यापूर्वीच वन विभागानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


४रानमांजर हे सहज ओळखता येते. मुखाचा भाग पाहिल्यास प्रथम ते बिबट्याच दिसते. परंतु पाय लांब, शेपूट आखूड, डोळे फिकट हिरवे, कान तांबूस, रंग भुरकट व राखाडी, शेपटीचे टोक काळे तर पंजे फिक्कट पिवळसर असतात. हा प्राणी भित्रा आहे. परंतु चेहऱ्यावरील कौर्यमुळे भिती निर्माण होते. गवताळ, झुडपे व दलदलीच्या भागात रानमांजर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

Web Title: Discussion Leopard calves went wild

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.