व्यापा-यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : नवापूर बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 08:49 PM2018-02-26T20:49:53+5:302018-02-26T20:49:53+5:30

Discussion on various topics in the meeting of the business: Navapur Bazar Committee | व्यापा-यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : नवापूर बाजार समिती

व्यापा-यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : नवापूर बाजार समिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अधिकारी व अनुज्ञप्तीधारक व्यापा:यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
आमदार सुरूपसिंग नाईक, जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, बाजार समितीचे चेअरमन मधुकर नाईक, संचालक गिरीश गावीत, सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी व रणजित पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 
बाजार समितीच्या नवापूर, विसरवाडी व खांडबारा कार्यक्षेत्रात व्यापार करणारे व्यापारी बैठकीस उपस्थित होते.  शासनाने बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी विक्री करावी अश्या सूचना केल्या आहेत. नवापूर तालुक्यात ही खरेदी विक्री बाजार समिती आवारातच व्हावी. यासाठी  व्यापा:यांना काही अडचणी व समस्या असल्यास त्या जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. व्यापा:यांचे प्रतिनिधी म्हणून गुलाम व्होरा यांनी व्यापा:यांसाठी बाजार समिती आवारात खरेदी केलेला शेतमाल साठवणुकीची सोय नाही. बाजार समितीने व्यापा:यांना धान्य साठवणुकीची सोय उपलब्ध करून द्यावी व सोय उपलब्ध होईस्तोवर व्यापा:यांना आहे त्या ठिकाणी          व्यापार करु द्यावा, अशी भूमिका मांडली.  बाजार समितीत शेतमालाची खरेदी विक्री होत नसल्याने बाजार समितीचे उत्पन्न बुडत आहे. दुसरीकडे शेतक:याला शासनाच्या सोयी सवलतींचा लाभ देता येत नसल्याचे सचिव अमोल पिंपळे यांनी         सांगितले. 
शासन आदेशाचे पालन करून बाजार समितीस सहकार्य करण्याची भूमिका  व्यापा:यांनी घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक पूरी यांनी सांगितले. बाजार समितीच्या उत्पन्नाचे स्नेत कमी असल्याने तात्पुरती सोय उभारून व्यापा:यांसाठी धान्य साठवणुकीसाठी प्रय} करण्यात येतील. प्रथमच आदिवासी विकास विभागाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बळकटी आणण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळांतर्गत भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. सुमारे तीन कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यास प्राप्त झाले असून त्या माध्यमातून नवापूर बाजार समितीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रय} होइल असे त्यांनी स्पष्ट केले. शासन नियमानुसार मात्र बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यावर जिल्हा उपनिबंधक ठाम राहिलेत.  आमदार नाईक म्हणाले की, शेतक:यांचे नुकसान व्हायला नको व व्यापारी बांधवासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने नवापूर बाजार समिती आवारासाठी दोन कोटी खर्चाचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास मंडळात सादर केल्याचे सांगितले. नवापूरची वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहता मध्यम मार्ग काढण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 
याप्रसंगी नवापूर बाजार समितीकडून राबविण्यात आलेल्या कृषी पणन महासंघाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेच्या लाभाथ्र्याना वाटप केलेल्या कर्जाचे प्रमाणपत्र पूरी व आमदार नाईक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

Web Title: Discussion on various topics in the meeting of the business: Navapur Bazar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.