दडी मारल्याने शेतकरी व मजूर वर्गासह नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:35 AM2021-07-14T04:35:56+5:302021-07-14T04:35:56+5:30

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेने बळीराजासह मजूर वर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे. जो दिवस जातो तो ऊन ...

Dissatisfaction with farmers and working class | दडी मारल्याने शेतकरी व मजूर वर्गासह नाराजी

दडी मारल्याने शेतकरी व मजूर वर्गासह नाराजी

Next

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेने बळीराजासह मजूर वर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे. जो दिवस जातो तो ऊन वारा निघून जात आहे. मात्र पावसाचे आगमन होत नसल्याने सध्या ग्रामीण भागातील चिमुकले पावसाच्या विनवण्या करण्यासाठी गल्लीबोळात फिरून ‘धोंडी धोंडी पाणी दे.... साय, माय पिकू दे’ अशी आर्त हाक मारून वरुण राजाची विनवणी करीत आहेत. जसे वृक्ष लागवडीचे महत्त्व दवाखान्यात ऑक्सिजनची गरज भासून नैसर्गिक मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात महागड्या किमतीत घ्यावा लागतो. तसेच महत्त्व पाण्याचेसुद्धा आहे. दिवसेंदिवस सगळीकडे अवैध वृक्षतोडीने वातावरणाचे संतुलन बिघडून याचा परिणाम पावसावर होत आहे व पावसाळ्यात वेळेवर वरुण राजाच्या आगमनासाठी विनवणी करावी लागत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात पाणी मागण्याची.................. जुनी परंपरा सुरू असून, हा तोडगा केल्यानंतर पाण्याचे आगमन होते, असे जाणकारांकाकडून सांगण्यात आले. सध्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाचे आगमन होत असून, जिल्ह्यातही काही ठिकाणी सरी कोसळल्याने काही प्रमाणात का होईना बळीराजाला याचा दिलासा मिळाला आहे. पाऊस येण्यासाठी जुन्या काळापासून सुरू असलेले पाणी मांडण्याची.............................. परंपरा आजही ग्रामीण भागासह शहरी भागात कायम असल्याचे दिसून आले.

Web Title: Dissatisfaction with farmers and working class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.