40 हजार भाविकांचा व्यसनमुक्तीचा संकल्प : रंजनपूर येथे आरतीपूजन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:57 AM2018-02-15T11:57:34+5:302018-02-15T11:57:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड (रंजनपूर) येथे आप पंथाच्यावतीने आयोजित आरतीपूजन कार्यक्रमात 40 हजार भाविकांनी हजेरी लावून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला़ यावेळी आप पंथाचे संस्थापक संत गुलाम महाराज आणि संत रामदास महाराज यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आल़े
मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी होत़े प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ़ कांतीलाल टाटिया, रूपसिंग पाडवी, तळोद्याचे नगरसेवक संजय माळी, हिरामण पाडवी, प्रकाश ठाकरे, किसन महाराज, हितेंद्र क्षत्रिय, डॉ़ शशिकांत वाणी, राजेंद्र राजपूत, विलास डामरे, गौरव वाणी उपस्थित होत़े
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिरामण पाडवी यांनी संत गुलाम महाराज यांच्या कार्याची माहिती दिली़ त्यानंतर जितेंद्र पाडवी यांनी 81 वर्षापासून वर्षातून चारवेळा होणा:या आरतीपूजन कार्यक्रमाची आणि त्याद्वारे चालवण्यात येणा:या व्यसनमुक्तीच्या चळवळीची माहिती दिली़ आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी मुला-मुलींना शाळेत पाठवले पाहिज़े त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे सांगितल़े जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी व्यसनमुक्त समाजासाठी संत गुलाम महाराज यांच्या शिकवणीनुसार आयुष्य जगले पाहिजे असे सांगितल़े माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी गावा गावांमध्ये गुटखा, दारू, जुगार आणि सट्टा बंदी करण्यात येऊन संतांची शिकवण पुढे सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल़े सूत्रसंचालन गुलाबसिंग गिरासे यांनी तर आभार जितेंद्र पाडवी यांनी मानल़े गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील आप पंथीयांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती़