चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:35 PM2019-12-02T12:35:07+5:302019-12-02T12:35:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील आचार्य काकासाहेब कालेलकर लोकसेवा केंद्रातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील आचार्य काकासाहेब कालेलकर लोकसेवा केंद्रातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त व आचार्य काका कालेलकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली़ स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवारी झाल़े
श्रॉफ हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमास बारडोली येथील स्वराज्य आश्रमाच्या निरंजना कलार्थी, विश्व समन्वय संघाचे उपाध्यक्ष अतुल प्रभाकर, अभिनव आचार्य, राजकुमार, अॅड़ रमणलाल शहा, कुसुम शहा, अॅड़केतन शहा, र्मचट बँकेचे उपाध्यक्ष बळवंत जाधव, मुख्याध्यापिका सुषमा शहा, मनिष शहा, उपमुख्याध्यापक राजेश शहा, कालिदास पाठक, राजेंद्र कोळी उपस्थित होते. पर्यावरण आज का युगधर्म या विषयावर आधारित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात ही स्पर्धा झाली़ स्पर्धेत 1 हजार विद्याथ्र्यानी सहभाग नोंदवला होता़
या स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रिया पटेल प्रथम, वृंदा गवळी द्वितीय, समिक्षा नांदेडकर तृतीय, उत्तेजनार्थ रोहित अहिरे, चौथी ते पाचवीच्या गटात श्रुती चौधरी प्रथम, मृदुला कासार द्वितीय, आरूषी बागुल तृतीय, नम्रता शिंदे व समीक्षा सराफ यांना उत्तेजनार्थ, माध्यमिक गटात सहावी ते आठवीच्या वर्गातून प्रीती पाटील प्रथम, खुशी सैंदाणे द्वितीय, राशी व्यास द्वितीय, कृष्णा चौधरी व हर्षल पवार उत्तेजनार्थ नववी ते बारावीच्या गटात प्रीती साळुंके प्रथम, भरतसिंग वळवी द्वितीय, दिपक नाईक तृतीय, राहुल सैंदाणे व श्वेता पाटील यांना उत्तेजनार्थ तसेच एकनाथ क:हाडे, ज्योती ठाकरे, अक्षरा भाट, विधी भरवाड, सबल सिंग कुशवाह यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली़ सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आल़े शहरातील विविध प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता़ सूत्रसंचालन डॉ. मृदूला वर्मा तर आभार फकीरा माळी यांनी मानले
यावेळी डॉ.भगवान पटेल, बळवंत जाधव, रमाकांत पाटील, मुकेश शहा, हेमंत पाटील, राजेश शहा ,हितेन शहा, सुषमा शहा, विना भल्ला, स्वाती शहा यांना समन्वय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.