जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:30 PM2020-01-11T12:30:10+5:302020-01-11T12:30:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मकरसंक्रातीनिमित्त जिल्ह्यात पतंगोत्सवाची धूम असते़ यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजावर प्रशासनाने बंद घातली असून ...

District administration banned nylon cat | जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी

जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मकरसंक्रातीनिमित्त जिल्ह्यात पतंगोत्सवाची धूम असते़ यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजावर प्रशासनाने बंद घातली असून यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी आदेश काढले आहेत़
प्लास्टिकचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या असल्याने संरक्षणची गरज असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियमांतर्गत नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे़
घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवण्याचे आदेशात म्हटले आहे़ मांजा विक्री झाल्यास कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे़
पतंग उडवितांना माजांच्या वापरामुळे वीज तारांवर घर्षण होऊन आग लागून अपघात घडण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे़

Web Title: District administration banned nylon cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.