लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:41 PM2018-12-02T12:41:45+5:302018-12-02T12:42:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काळात कधीही होऊ शकते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काळात कधीही होऊ शकते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाला आवश्यक त्या तयारीच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार नंदुरबारात शनिवारी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात मतदान यंत्र, मतदान केंद्र, मणुष्यबळ, वाहने यांची उपलब्धता आणि इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, गेल्याच आठवडय़ात उपलब्ध सर्व मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट उपकरण यांची चाचपणी पुर्ण करून ते सील करण्यात आले.
लोकसभा निवडणुका मार्च, एप्रिल मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या आधीही निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्यामुळे निवडणुकीची पुर्वतयारी सर्व जिल्हा प्रशासनांनी करून घेण्याच्या सुचना सर्व जिल्हा प्रशासनांना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून येथे उपलब्ध असलेले मतदान यंत्र, कंट्रोल युनिट व यंदापासून वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट उपकरण यांची चाचपणी घेण्यात आली. उपलब्ध सर्वच जवळपास तीन हजार यंत्र मागील डाटा काढून, आवश्यक त्या दुरूस्ती करून सील करण्यात आले आहेत.
शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सर्व संबधित यंत्रणांची, विभाग प्रमुखांची याच पाश्र्वभुमीवर बैठक घेतली. सर्वाकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी.बच्छाव, पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, पुंडलीक सपकाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिका:यांनी सांगितले, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प असणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती, दुर्गम भागातील रस्ते यांची आवश्यक ती दुरूस्ती करून घ्यावी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंदे रोखावे व बंद करावे. संवेदनशील, अतिसंवेदनशील केंद्रांची निश्चिती करावी. फ्लॉईंग स्कॉड तयार करावे. पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करावा. मतदान, मतमोजणीच्या वेळी लागणारा कर्मचारी, पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. वाहनांची आवश्यक तेव्हढी व्यवस्था करावी आदी सुचना दिल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पाश्र्वभुमीवर विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यात मणुष्यबळ व्यवस्थापन, संगणक कक्ष, ईव्हीएम/व्हीव्हीपॅट समन्वय कक्ष, वाहतूक व्यवस्थापन कक्ष, माध्यम नियंत्रण व प्रमाणिकरण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वविध विभागाकडून काही सुचना व त्या अनुषंगाने यावेळी जिल्हाधिका:यांनी आढावा देखील घेतला.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याला विविध यंत्रणा उपलब्ध झाली आहे.
2,879 बॅलेट युनिट, 1, 674 कंट्रोल व तेवढेच व्हीव्हीपॅट मशीन.
मतदान केंद्राध्यक्ष 1,380, राखीव 414 एकुण 1,794.
मतदान अधिकारी 5,520, राखीव 1,656, एकुण 7,176
शिपाई 1,380, राखीव 414, एकुण 1,794.
एकुण मणुष्यबळ 8,280, राखीव 2,484, एकुण 10,764.
आवश्यक वाहने 394, राखीव 79, एकुण 472.
मतदान केंद्रांची एकुण संख्या 2068.
विधानसभा निहाय मतदान केंद्र : अक्कलकुवा 349, शहादा 335, नंदुरबार 360, नवापूर 336, साक्री 365, शिरपूर 323.