डिजिटल प्रशासनात जिल्हा राज्यात तिसरा
By admin | Published: January 17, 2017 11:55 PM2017-01-17T23:55:35+5:302017-01-17T23:55:35+5:30
नंदुरबार जिल्ह्याने शासनाच्या ई-ऑफिस या डिजिटल संकल्पनेत बाजी मारत, तिस:या क्रमाकांचे ई-प्रशासन राबवले आह़े
नंदुरबार : राज्यात आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या नंदुरबार जिल्ह्याने शासनाच्या ई-ऑफिस या डिजिटल संकल्पनेत बाजी मारत, तिस:या क्रमाकांचे ई-प्रशासन राबवले आह़े यामुळे कामकाज सोपे होऊन प्रत्येक कागदाची नोंद ही शासनदरबारी झाली आह़े राज्यात केवळ इतर दोन जिल्ह्यात ई-ऑफिस ही प्रणाली कार्यरत आह़े
सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह दोन राज्यांच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात संपर्क आणि दळणवळण यंत्रणेचा अभाव असा गवगवा सातत्याने गेल्या काही वर्षात झाला होता़ मात्र गेल्या वर्षात या स्थितीत बदल झाला असून डिजिटल इंडिया या संकल्पनेला बळ देण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आह़े प्रशासनाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते नव्या अॅपचे उद्घाटन केले आह़े अॅप तयार करणारा पाचवा जिल्हा अशी ओळख राज्यात होत आह़े या अॅपला डाऊनलोड करून युझर्सनी पसंतीची पावती दिली आह़े
समस्या तत्काळ निघतात निकाली
मंत्रालयीन स्तरावर 100 टक्के ई- ऑफिस ही संकल्पना राज्य शासनाने 2014 पासून राबवण्यास सुरूवात केली होती़ राज्यभरात येणा:या नागरिकांच्या तक्रारी, निविदा, अजर्, तक्रार अजर्, निवेदन, प्रस्ताव, ग्रामपंचायतींचे ठराव यासह इतर बरेच लिखित स्वरूपात येणा:या कागदांना स्कॅन करून त्याच्या नावासह संगणकात सेव्ह करून तो कागद संबंधितांच्या डेस्कवर पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न होता़ तो 100 टक्के यशस्वी ठरल्यानंतर विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली आली आह़े
4राज्यात प्रारंभी सिंधुदुर्ग व जालना या दोन जिल्ह्यात ई-ऑफिस संकल्पना राबवण्यात आली़ या दोन्ही ठिकाणी यश आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून ही संकल्पना राबवण्यात येत आह़े याठिकाणीही पूर्ण यश आले असून, प्रत्येक विभागात देण्यात आलेल्या प्रत्येक कागद आणि त्यावरील मजकूराची नेमकी काय, स्थिती आह़े हे नागरिकांना घरबसल्या पाहणे शक्य झाले आह़े संबंधित विभाग प्रमुख फाईल नेमकी कोणाकडे आहे पाहून, त्यावर निर्णय देऊन समस्या निकाली काढत आहेत़
मोबाईल अॅपला मिळतेय पसंती
एकीकडे ई-ऑफिसमध्ये तिसरा क्रमांक मिळवणा:या जिल्हा प्रशासनाने स्वत:चे ‘अपग्रेड’ झालेले मोबाईल अॅप विकसित केले आह़े एनआयसीने केवळ 15 दिवसात विकतित केलेल्या ‘नंदुरबार मोबाईल’ अॅपला पसंती मिळत असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले होत़े अद्यापर्पयत जिल्ह्यातील अडीच हजार नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केल्याची माहिती समोर आली आह़े
नंदुरबार शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल्स, रस्ते, प्रशासकीय कार्यालये, बसस्थानक, रेल्वे यांची इत्थंभूत माहिती या अॅपमध्ये देण्यात आली आह़े यामुळे बाहेरगावाहून येणा:या पर्यटकांची सोय झाली आह़े
यासोबतच औषध विक्रेते, खाजगी आणि सरकारी दवाखाने, सातबारा उतारा आणि मतदार याद्यांची माहिती याठिकाणी देण्यात आली आह़े आपत्कालीन स्थितीत मदत मिळवण्यासाठी हे अॅप सर्वात उपयोगी ठरत असल्याचे मोबाईल युझर्सचे म्हणणे आह़े
राज्यात आतार्पयत हिंगोली, नांदेड, जालना नंतर नंदुरबार जिल्ह्याचे अधिकृत मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आह़े