गावीतांच्या विरोधासाठी जिल्हा काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:02 PM2018-12-30T13:02:50+5:302018-12-30T13:02:57+5:30
पक्ष प्रवेशाला विरोध : नंदुरबारची जागा काँग्रेसलाच मिळावी
नंदुरबार : भाजपाचे आमदार डॉ़ विजयकुमार गावीत व कन्या खासदार डॉ़ हीना गावीत ह्या आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवणार असल्याची चर्चा असून त्यासाठी नंदुरबार लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी दावा केल्याच्याही सूर व्यक्त होत असल्याने त्याबाबत जिल्हा काँग्रेस अधिक आक्रमक झाली आह़े
नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण काँग्रेस विरुद्ध डॉ़ विजयकुमार गावीत असेच राहिले आह़े यापूर्वी डॉ़ विजयकुमार गावीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात जरी आघाडी होती तरी स्थानिक स्तरावर मात्र या दोन्ही गटातील विरोध कायम होता़ गेल्या निवडणूकीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला व लोकसभेची जागा तसेच नंदुरबार विधानसभेची जागा त्यांनी भाजपातर्फे जिंकली़
सध्या 2019 मध्ये होणा:या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या हालचाली गतीमान झाल्या असून सर्वच पक्षांची तयारी सुरु आह़े काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र निवडणूक लढवणार असून जागा वाटपात नंदुरबारची जागा राष्ट्रवादीने मागितली आह़े या जागेवर खासदार डॉ़ हीना गावीत ह्या राष्ट्रवादीतर्फे उमेदवार राहतील अशी राजकीय चर्चा मुंबईपासून तर नंदुरबार्पयत सुरु आह़े त्यामुळे काँग्रेस पक्षात त्याचे पडसाद उमटत आहेत़
शुक्रवारी काँग्रेसचे दोन मेळावे झाल़े या दोन्ही मेळाव्यात ते सूर ऐकायला मिळाल़े सकाळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी कार्यकत्र्याच्या मेळाव्यात नंदुरबारची जागा काँग्रेस सोडणार नाही़ असा दावा करीत जर डॉ़ विजयकुमार गावीत हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असतील, तर त्यालाही पक्षात प्रवेशाला विरोध असल्याचे जाहिर केल़े त्यानंतर दुपारी निवडणूक संदर्भात काँग्रेस कार्यकत्र्याची पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी चेल्ला वामशी चाँद रेड्डी यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ या बैठकीतही माजी खासदार माणिकराव गावीत, आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील यांनी डॉ़ विजयकुमार गावीत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास विरोध करुन नंदुरबारची जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार नाही, याबाबत ठाम मत व्यक्त केल़े तसेच डॉ़ गावीत यांच्यावर टीकाही केली़ ते ज्या पक्षाची सत्ता असते, त्या पक्षात प्रवेश करतात, असा आरोप करण्यात आला़