लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:18 PM2018-09-15T12:18:08+5:302018-09-15T12:18:20+5:30

District meetings were held on the topic of irrigation and education | लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली

लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे अधिका:यांचे फॅड वाढत चालले आहे. त्यातून काय निष्पन्न होते याची दखल वरिष्ठ अधिका:यांनी घ्यावी या मुद्यावरून जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. धडगाव येथे ही सभा शुक्रवारी घेण्यात आली. 
धडगाव येथील बीआयआरसीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तोरणमाळ नंतर धडगाव येथे स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, सभापती हिराबाई पाडवी, लता पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केवळ विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. धोरणात्मक निर्णय किंवा ठराव करण्यात आला नाही. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदस्यांनी अनेक विषयांवर तक्रारींचा सूर लावला. लघु सिंचन विभागाअंतर्गत नाला खोलीकरण, गाळ काढणे यासह इतर कामांबाबत गेल्या बैठकीत सदस्यांनी तक्रार केली होती. कामे न करता बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप गेल्या बैठकीत अभिजीत पाटील यांनी केला होता. त्याच विषयावर आजच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली.  दर वेळच्या बैठकीत त्याच त्या विषयांवर चर्चा होते, परंतु कार्यवाही व परिणाम काहीच दिसून येत नाही यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला.
लघु सिंचन विभागाचे कुणीही अधिकारी किंवा प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे सुहास नाईक यांनी संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
दुर्गम भागात शिक्षकांची संख्या कमी, ग्रामसेवकांची अनियमितता याबाबत रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला. अधिकारी केवळ भेटी देवून काही कर्मचा:यांवर कारवाई करतात. या भेटींचा वेगळा उद्देश देखील राहत तर नाही ना? असा संशयात्मक सूर देखील त्यांनी व्यक्त      केला. नर्मदा खो:यातील दुर्गम भागात भेट देण्याचे  अधिकारी टाळतात. तेथे कसे काम चालते. काय सुरू    आहे. अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र सुरू आहेत काय? कर्मचारी नियमित राहतात काय? याची किती आणि कशी चौकशी केली, भेटी दिल्या याची माहिती कधी दिली जाते काय? असे एक ना अनेक प्रश्न पाडवी यांनी उपस्थित     केले.
शाळा बाह्य विद्याथ्र्याचे सव्र्हेक्षण करण्याबाबत नाईक यांनी सुचीत केले. तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी उपस्थित केली. मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सुचित केले. दुर्गम भागात जिल्हा परिषदेची बैठक घेण्याचा हा दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी तोरणमाळ येथे अशा प्रकारची स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आता या पंचवार्षीकच्या शेवटी धडगावला बैठक घेण्यात आली. अशा बैठकीतून काय निष्पन्न होते याबाबत मात्र, पदाधिकारी व सदस्यही अनभिज्ञ आहेत. 

Web Title: District meetings were held on the topic of irrigation and education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.