नंदुरबार जिल्ह्यात 200 शिक्षकांवर टांगती तलवार कायम
By admin | Published: July 7, 2017 12:57 PM2017-07-07T12:57:22+5:302017-07-07T12:57:22+5:30
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होऊनही 17 दिवसांची प्रतीक्षा
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार , दि.7 - प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे ऑनलाइन आदेश निघून 17 दिवस होऊनही बदलीपात्र 201 शिक्षक हवालदिल झाले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होत नसल्याने शिक्षक अधांतरी आहेत. परिणामी एकूण शैक्षणिक कामकाजावरदेखील परिणाम होत आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांतील शिक्षकांना यापूर्वीच कार्यमुक्त करण्यात आले असून, लगतच्या धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातूनही शिक्षक कार्यमुक्त झालेले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदलीच्या सर्वच प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यात आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियादेखील आहे. पूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना अनेकांचे उंबरठे ङिाजवावे लागत होते. यंदा केवळ ऑनलाइन फॉर्म भरून लागलीच आंतरजिल्हा बदली शिक्षकांना मिळाली आहे. जिल्ह्यातून 201 शिक्षक आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यात जाणार आहेत. त्यात 194 मराठी व सात उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे.
ऑनलाइन बदली प्रक्रियेनुसार 24 जून रोजी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याच दिवशी आदेशही देण्यात आले. त्यानंतर संबंधित 201 शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे कार्यमुक्त करणे आवश्यक होते.