जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:16 PM2019-07-12T13:16:22+5:302019-07-12T13:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महसूल कर्मचा:यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने तत्त्वत: मान्य केल्या होत्या परंतू त्यांची अंमजबजावणी होत नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महसूल कर्मचा:यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने तत्त्वत: मान्य केल्या होत्या परंतू त्यांची अंमजबजावणी होत नसल्याने संपाचा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आह़े याबाबत जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल़े
निवेदनात राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेला पाचारण करत प्रलंबित मागण्यांवर वेळोवेळी चर्चा केली होती़ 3 जानेवारी रोजीच्या बैठकीत काही प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या़ परंतू त्यांच्या अंमलबजावणीची कारवाई मात्र आजवर झालेली नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आह़े यानुसार 11 जुलै रोजी द्वार निदर्शने, 23 रोजी घंटानाद, 30 रोजी काळ्या फिती लावून शासकीय कामकाज, 9 ऑगस्ट रोजी 1 तास जास्तीचे कामकाज करुन शासनाचा निषेध करणे, 16 ऑगस्ट रोजी संगणक व लेखणी बंद आंदोलन, 21 ऑगस्ट रोजी सामुदायिक रजा टाकून धरणे, 28 एकदिवसीय लाक्षणिक संप आणि 5 सप्टेंबर रोजी बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आह़े