मतदान टक्केवारीत जिल्हा अव्वलसाठी प्रय}
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:54 AM2019-10-06T11:54:30+5:302019-10-06T11:54:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मतदारांशी संपर्क वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मतदारांशी संपर्क वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करा, असे आवाहन नाशिक विभागीय उपायुक्त डॉ.अजरुन चिखले यांनी केले. यावेळी उत्कृष्ट बीएलओंचा सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील गंधर्व सभागृहात झालेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिका:यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. डॉ.चिखले यांच्या हस्ते लोकसभा निवडणूकीत नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील अधिक मतदान झालेल्या केंद्रावरील प्रथम आलेले बीएलओ सुनिल भामरे, द्वितीय मोहन शिंपी आणि तृतीय बीएलओ दयानंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.चिखले म्हणाले, मतदान केंद्रावर 90 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवून काम करावे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या कमी मतदानाची कारणे शोधून यावेळी अधिक मतदान होईल असे प्रय} करावे.
दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या सुविधेची माहिती जनतेला द्यावी. मतदानाच्या बाबतीत लोकशिक्षणाच्या माध्यमातून टक्केवारी वाढविता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.भारुड म्हणाले, आदर्श शिक्षक, आदर्श मतदान केंद्र आणि आदर्श केंद्रस्तरीय अधिकारी अशा त्रिसुत्रीवर काम करावे. लोकशाही बळकट करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे या कर्तव्यभावनेने मतदारांशी संपर्क वाढवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.