नंदुरबारात रेल्वे मजदूर संघाचा विभागीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:06 PM2019-01-06T19:06:40+5:302019-01-06T19:06:46+5:30
नंदुरबार : वेस्टर्न रेल्वे मजदूर संघातर्फे येत्या 7 जानेवारीला देशभरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे ...
नंदुरबार : वेस्टर्न रेल्वे मजदूर संघातर्फे येत्या 7 जानेवारीला देशभरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे महामंत्री जे.जी. माहूरकर यांनी दिली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात मुंबई विभागाच्या विभागीय समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन जे.जी. माहुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शरीफ खान पठाण, अजयकुमार सिंह, मुरली अय्यर, श्रीकृष्ण मुणगेकर, चतुर गिरासे, राजेश पंदीरकर, मंडळ अध्यक्ष किरण पाटील, अमीन मिङरा, सुजीत भास्करन, पी.के. सिंह, रमेश जांगीड, रामनारायण राजीव शर्मा, यतीन शिंदे, बी.डी. परमार आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते एन.एफ.आय.आर. की कुछ महत्वपूर्ण उपलब्धिया या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
माहुरकर पुढे म्हणाले की, रेल्वेचे 13 लाख 20 हजार कर्मचारी रेल्वेत काम करतात. रिक्त जागा भरल्या न गेल्याने या कर्मचा:यांना विश्रांती व सुटी मिळत नाही. ओव्हर टाईम काम करून घेतले जाते. देशात 24 तासात 12 हजार गाडय़ा दररोज मेल व एक्सप्रेस व सात हजार मालगाडय़ा चालवल्या जातात. रिक्त जागांमुळे कर्मचा:यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. 1 जानेवारी 2004 पासून लागू नवी पेन्शन योजना रद्द करून पूर्वीची योजना लागू करावी, ट्रॅकमन यांना उच्चस्तरीय कमिटीद्वारा निर्धारित ग्रेड पे 2800-10 टक्के 2400-20 टक्के, एक हजार 999 - 20 टक्के, एक हजार 800 - 50 टक्के त्वरित लागू करावी. रनिंग स्टॉफला किलो मीटर्स भत्ता एन.एफ.आय.आर.द्वारा सूचविलेला नवीन संशोधीत दर 648 पासून द्यावा. रेल्वेचे एक लाख 25 हजार ट्रॅकमन 77 हजार किलो मीटर्स नेटवर्क पाहतात. त्यांचे कामाची स्थिती खूप वाईट आहे. 10 ते 12 तास काम करावे लागते. अॅप्रेंटीसच्या कर्मचा:यांनाही लवकर सेवेत घेण्यासाठी सहा प्रय} करणार आहेत. या विविध मागण्यांसाठी येत्या 7 जानेवारी रोजी देशभरात धरणे आंदोलन करणार आहेत. यात सात ते आठ लाख कर्मचारी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी शरीफखान पठाण, अजयकुमार सिंह यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक चुतर गिरासे व राजेश पंदीरकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिता सातपुते तर आभार किरण पाटील यांनी मानले.
सुनील राजोरिया, रवींद्र पोतदार, विजय बत्तीसे, प्रदीप सिंह, एस.के. पांडे, रवींद्र तमायचेकर, सुनील पगारे, राकेश कडोसे, वासू वानखेडे, गणेश दीपचंद, राकेश चौधरी, प्रतापसिंग, अनिल हवालदार यांनी परिश्रम घेतले.