दिव्यांग महिलेला विद्युत लोकपालांकडून न्याय
By admin | Published: April 5, 2017 01:19 PM2017-04-05T13:19:29+5:302017-04-05T13:19:29+5:30
दिव्यांग महिलेने डिमांड भरूनही एका वर्षानंतर वीज जोडणी देणा:या वीज कंपनीच्या अभियंत्याला विद्युत लोकपालने ‘दंड’ ठोठावला आहे.
Next
>नंदुरबार येथील दाम्पत्याचा लढा : वीज अधिका:याला दंड
नंदुरबार,दि.5- वीज कनेक्शनसाठी दिव्यांग महिलेने डिमांड भरूनही एका वर्षानंतर वीज जोडणी देणा:या वीज कंपनीच्या अभियंत्याला विद्युत लोकपालने ‘दंड’ ठोठावला आहे. दिव्यांग महिलेला न्याय देत लोकपालांनी कंपनीला अधिका:यावर कारवाईचे आदेश दिले आहेत़
नंदुरबार येथील सरोज श्रीनिवास माहेश्वरी या दिव्यांग महिलेने 20 ऑगस्ट 2014 रोजी घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज देऊन डिमांड रक्कम भरली होती़ हा भरणा केल्यानंतर संबधित महिलेला तात्काळ वीज जोडणी उपलब्ध करून देणे गरजेचे असतानाही कंपनीने तब्बल वर्षाच्या कालावधीनंतर वीज जोडणी केली़ वीज कनेक्शन देण्यास उशिर केला म्हणून सरोज माहेश्वरी यांनी विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती़ या तक्रारीची दखल घेत, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे नंदुरबार विभागाचे तत्कालीन सहायक अभियंता यांना कामातील दिरंगाईबाबत दंड करून तो भरण्याचे आदेश दिले होत़े महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्याकडे केलेल्या या अर्जावर ग्राहक गा:हाणे विनियम 2006 यांच्या विनियम 17़2 अन्वये सुनावणी करण्यात आली होती़ वीज कंपनीच्या अधिका:यावर प्रथमच विद्युत लोकपालने कारवाई करत कंपनीच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत़
लोकपाल यांनी ओढले कंपनीवर ताशेरे
विद्युत लोकपालने सरोज माहेश्वरी यांच्या बाजूने निर्णय देताना तत्कालीन सहायक अभियंता हिंदोळे यांना चार हजार 100 रूपयांचा दंड केला आह़े मंचाच्या आदेशानुसार देयक दुरूस्ती दिरंगाईबाबत 400 तर सदोष मीटर वाचनापोटी 100 असे एकूण चार हजार 600 रूपये जमा करण्याचे आदेश संबधित अधिका:याला दिले होत़े
हा निकाल देताना विद्युत लोकपाल यांनी विज कंपनी कार्यकारी अभियंता मंडळ कार्यालय नंदुरबार यांच्या कामकाजावर ताशेरे ओढत सुनावणीला कायम गैरहजर राहणारे तत्कालीन कार्याकारी अभियंता यांनी नियमांचा भंग केल्याचे म्हटले आह़े हा निकाल दिल्यानंतर संबधित तक्रारदार यांना सूचनापत्राची प्रत देऊन त्याचा अभिप्राय हा विद्युत लोकपाल यांच्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात येऊन कंपनीने कारवाई न केल्याने लोकपाल यांनी कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली़