अस्तंबा येथील उत्सव यात्रा नव्हे दिवाळीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:16 PM2019-10-27T12:16:58+5:302019-10-27T12:17:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अस्तंबा येथे दिवाळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने होणा:या पूजेला सातपुडय़ाती आदिवासी ‘डोगोअ दिवाली’ असे म्हणतात. येथील ...

Diwali is not a festive trip at Estamba! | अस्तंबा येथील उत्सव यात्रा नव्हे दिवाळीच!

अस्तंबा येथील उत्सव यात्रा नव्हे दिवाळीच!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अस्तंबा येथे दिवाळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने होणा:या पूजेला सातपुडय़ाती आदिवासी ‘डोगोअ दिवाली’ असे म्हणतात. येथील पूजेनंतर त्या भागात गावदिवाळींना सुरुवात होते. त्यामुळे ही यात्रा नसून दिवाळीच असल्याचे तेथील काथाकार व काही जाणकारांमार्फत सांगितले जात आहे. 
सातपुडय़ातील अस्तंबा ता.धडगाव येथे दिवाळीनिमित्त पूजा करण्याची तेथील आदिवासींची पारंपरिक पद्धत आहे. खरीप हंगामातील नवीन अन्न याच वेळेस निघत असून या उत्पन्नातून भविष्यात अन्नाचा दुष्काळ जाणवू नये व मानवी जीवनासह पशुधनाच्या आरोग्यासाठी ही पूजा करण्यात येत आहे. या पूजेला सातपुडय़ातील आदिवासी ‘डोगोअ दिवाली’ असे म्हणत असून याच पूजेनंतर त्या भागातील गावदिवाळींना सुरुवात होते. परंतु दिवाळीनिमित्त होणा:या पूजांमध्ये अस्तंबा येथील सर्वाधिक मोठी पूजा असल्याने ¨ठकठिकाणाहून भाविकही येऊ लागले आहे. त्यामुळे आदिवासींच्या या दिवाळीला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे सातपुडय़ात पारंपरिक पद्धतीने मौखिक साहित्यीकार तथा कथाकार व काही जाणकारांनी म्हटले आहे. 
अस्तंब्याच्या दिवाळी पूजेसाठी प्रत्येक परिवारातील प्रमुख व्यक्ती जात असतो. ही व्यक्ती सोबत नवीन अन्नाचे कण व शेती नांगरतांना वापरले गेलेले दोर देखील नेत आहे. त्याशिवाय रोशा घटकातील विशिष्ट प्रकारच्या एका वनस्पतींची छोटी मोळीही नेण्याची प्रथा  आहे. अस्तंबा येथे पूजा करुन परतणारे भाविक हे गवताची मोळी पूजाविधी करीत दरवाजावर लावत असतात. या पूजेनंतर समाजात नवीन अन्नाच्या पूजेला सुरुवात होते.


धडगाव तालुक्यातील सर्वात उंच डोंगरावर ही पूजा होत असल्यामुळे तेथे जाणा:या प्रत्येक भाविकांना चारही मार्गाने गेले तरी डोंगराच्या पायथ्यापासून चढावेच लागते. तेथे जाणारे भाविक हे अश्वत्थमा ऋषींचा जयजयकार करीत डोंगरावर जातात. तिव्र चढा व सलग चढावे लागत असल्यामुळे बहुतांश भाविक हे दमून जातात. त्यामुळे सातपुडय़ातील आदिवासी  भाषेत ‘नाडो टाकीने खेची ले ’ अशी घोषणात्म भावनाही व्यक्त करण्यात येत असते. 
आदिवासी भाषेतील डोगोअ याचा अर्थ डोंगर असा होत असून या पूजेला डोंगरावरची दिवाळी असे म्हटले जात आहे. त्यामुळे तेथील कथाकार व काही जाणकारांमार्फत सांगण्यात येत   आहे. 
 

Web Title: Diwali is not a festive trip at Estamba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.