रेल्वेसाठी दिवाळीत वेटींग कमी प्रत्येकाला जागा मिळण्याची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:57 AM2020-11-22T11:57:05+5:302020-11-22T11:57:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे कमी झालेली रेल्वेप्रवाशांची संख्या पुन्हा वाढत असून गुजरातसह उत्तर भारतात जाणा-या प्रवाशांना सहज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे कमी झालेली रेल्वेप्रवाशांची संख्या पुन्हा वाढत असून गुजरातसह उत्तर भारतात जाणा-या प्रवाशांना सहज आरक्षण मिळत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार रेल्वे स्थानकावर आहे. रेल्वेच्या आरक्षण चार्टमध्ये सीट्स उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढल्याने दिवाळीत गावी जाणारे आणि गावाहून परतणा-यांना मोठा दिलासा मिळाला होता.
सध्या नंदुरबार रेल्वे स्थानकावरुन आठवडाभरात १५ गाड्या चालवण्यात येत आहेत. या प्रवासी एक्सप्रेस गाड्यांपैकी तीन गाड्या दररोज मार्गस्थ होत असून उर्वरित १२ प्रवासी गाड्या ह्या आठवड्यातील सातही दिवस निर्धारित वेळेनुसार गाड्या चालत आहेत. साप्ताहिक गाड्या वगळता नियमित चालवण्यात येणा-या तीन गाड्यांपैकी गुजरातकडे जाणा-या सर्व गाड्यांना आरक्षण मिळत असल्याचे दिसून आले आहे. लांबचा पल्ला गाठून येणा-या गाड्यावेळोवेळी रिकाम्या होत असल्याने नंदुरबारात येईपर्यंत अहमदाबादकडे जाणा-यांना सहज बुकींग मिळत असल्याचे चित्र आहे. सोबत उत्तर भारतातील शहराकडे जाणा-या प्रवाशांनाही बुकींग मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने नागपूर पर्यंतचे आरक्षण मिळणे काहीअंशी जड जात असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. यामुळे काहींचा प्रवासही लांबला आहे.
या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल
सुरत-वाराणसी ताप्तीगंगा एक्सप्रेस, हावडा व छपरा या तीन गाड्याच सध्या सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजा असल्याने या गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. यामुळे नागपूर पर्यंत जाण्यासाठी अनेकांना वेटींग करावे लागले. येत्या १ डिसेंबरपर्यंत या गाड्यांना आरक्षण आहे.
जिल्ह्यात रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ
रेल्वेच्या एकूण सहा फे-या ह्या दैनंदिन असल्या तरी उर्वरित २४ फे-या ह्या विविध दिवशी होत आहेत. यातून त्या-त्या मार्गावरील प्रवाशांना ठराविक दिवशी गावी जाण्याचे नियोजन करावे लागत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे. यामुळे ब-याचवेळा रेल्वे स्थानकात शुकशुकाट असतो. परंतू गाडी येण्याच्या वेळी मात्र गर्दी असते.