रात्रपाळीला बसस्थानकात कर्मचारी मिळेना

By admin | Published: February 8, 2017 11:57 PM2017-02-08T23:57:51+5:302017-02-08T23:57:51+5:30

अक्कलकुवा येथील प्रकार : लांब पल्ल्याच्या बसेस मार्गस्थ होतात नोंदणीअभावी

Do not get an employee at the bus station at night | रात्रपाळीला बसस्थानकात कर्मचारी मिळेना

रात्रपाळीला बसस्थानकात कर्मचारी मिळेना

Next

अक्कलकुवा : गुजरात राज्यात जाणा:या रातराणी व रात्री उशिरा अक्कलकुवा बसस्थानकात येणा:या बसेसची नोंद करणारे अधिकारी अगाराला मिळत नसल्याने बाहेरून येणा:या चालक व वाहकांची चांगलीच धांदल उडत आह़े
सुमारे 74 बसेस, चार मिनीबसेस असलेल्या अक्कलकुवा आगारात एकूण 283 कर्मचारी कार्यरत आहेत़ यात 129 चालक आणि 129 वाहक आहेत़ एवढा मोठा आवाका असलेल्या या आगारात केवळ दोनच वाहतूक नियंत्रक असल्याने समस्या वाढत आहेत़ वाहतूक नियंत्रकांची संख्या कमी असल्याने बसस्थानकात सायंकाळी 7़30 नंतर अधिकारी दिसून येत नसल्याने चौकशीसाठी येणारे प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या बसेसचे चालक-वाहक यांच्यापुढे समस्या निर्माण होत आहेत़
याबाबत अनेकवेळा सांगूनही बसस्थानकात कर्मचारी थांबत नसल्याची माहिती देण्यात आली़ रात्रभर बसेस येत असल्याने या ठिकाणी रात्रपाळीसाठी अधिकारी नियुक्त करण्याची गरज आह़े (वार्ताहर)

रातराणी बसेसची नोंद रखडते
अक्कलकुवा बसस्थानकात सायंकाळी सातनंतर कायम शुकशुकाट असतो़ स्थानकात लावलेल्या चौकशी कक्षाचा कालावधी हा सकाळी 5़30 ते रात्री 9 या वेळेत आह़े यासाठी एक वाहतूक नियंत्रक सकाळी 5़30 ते दुपारी एक व दुसरा अधिकारी दुपारी एक ते रात्री नऊ या वेळेत या ठिकाणी नियुक्त करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत़ दुपारी एक वाजेर्पयत या ठिकाणी कामकाज सुरळीत चालत असल्याची माहिती आह़े मात्र दुपारी एक ते रात्री 9 या वेळेआधीच वाहतूक नियंत्रक या ठिकाणाहून बाहेर पडत असल्याची माहिती आह़े यामुळे सायंकाळी 7़30 नंतर येणा:या बसेसची नोंदच होत नाही़
सायंकाळी सात वाजेनंतर चाळीसगाव, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे व नाशिक या बसेस 11 वाजेर्पयत बसस्थानकात फे:या पूर्ण करून येतात़ यातील काही बसेस ह्या बाहेरील आगाराच्या असल्याने त्यावर नियंत्रकाचा शेरा आवश्यक असतो़ मात्र कर्मचा:याअभावी मुक्कामी राहणा:या किंवा येथील चालक-वाहकांना तशाच बसेस उभ्या कराव्या लागत आहेत़ या बसेसमधून उतरणा:या प्रवाशांना पुढे जायचे असल्यास चौकशीसाठी कोणीही उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत़

सायंकाळी सात वाजेनंतर गुजरात राज्यातील अंकलेश्वर, बडोदा, अहमदाबाद, राजपिपला, सुरत या मार्गावर जाणा:या बसेस येतात़ यात शिरपूर आगाराची बस रात्री 11़30, अंकलेश्वर 7़20, सुरत 10़00, अहमदाबाद 8़45 यासह रात्री 12 वाजेर्पयत विविध बसेस स्थानकात येत असल्याची माहिती आह़े यातील गुजरातमधून  येणा:या बसेस ह्या पहाटेर्पयत अक्कलकुवा बसस्थानकात येतात़ रात्रभर बसेस येत असताना कर्मचारीच नसल्याने चालक-वाहक आणि स्थानकात येणा:या प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत़ या बसेसची नोंद होत नसल्याने त्यांना छोटा-मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत़ रात्रीच्या वेळी चालणा:या बसेसची व्यवस्थित पाहणी करून त्या मार्गस्थ करण्याची जबाबदारी संबंधित अधिका:यांची आह़े एखाद्या वेळी बसेसबाबत आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रवाशांचे मदतकार्य करण्याबाबत अनभिज्ञता असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आह़े आगारप्रमुखांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रपाळीला दोन कर्मचा:यांची नियुक्ती करण्याची प्रवाशांची मागणी आह़े

जमिनीवर काढावी लागते झोप
एकीकडे बसस्थानकात रात्रपाळीला कर्मचारी नाहीत, तर दुसरीकडे बाहेरून येणा:या कर्मचा:यांना विश्राम करण्यासाठी योग्य ते विश्रामगृह नाही़ सध्या अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहात स्वच्छता करण्यात येत नाही़ या ठिकाणी येणा:या चालक आणि वाहकांना जमिनीवर झोपावे लागत आह़े सामान ठेवण्यासाठी कपाटही नसल्याने चोरीची भीती चालक-वाहकांना सतावत असत़े 
बसस्थानकात रात्री उशिराने येणा:या बसेसमध्ये अक्कलकुवा आगारातूनच सुटणारी वाशिम बसही आह़े मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रवासी मिळत नसल्याने ही बस रद्द करण्यात येत आह़े
 

Web Title: Do not get an employee at the bus station at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.