डॉक्टरांचा नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:13 PM2018-07-29T13:13:26+5:302018-07-29T13:13:35+5:30

खासदारांना निवेदन : बैठकीत विविध विषयांवर चर्चा

The doctor stopped the burns in Nandurbar district | डॉक्टरांचा नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद

डॉक्टरांचा नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद

Next
<p>नंदुरबार : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे अनेक रुग्णांनी थेट जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे देशव्यापी संपात सहभाग घेतला. असोसिएशनच्या सर्वच डॉक्टरांनी बाह्य रूग्ण विभाग शनिवारी बंद ठेवला होता. त्यामुळे अनेक रुग्णांना परत फिरून जावे लागत होते. डॉक्टर असोसिएशनतर्फे दोन दिवस आधीपासून संपाचे सुतोवाच करण्यात आलेले असतांनाही अनेक रुग्णांना त्याबाबत माहिती नव्हते. त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठय़ा रुग्णालयांमध्ये नंबर लावण्यासाठी सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती. परंतु बंद असल्याचे लक्षात आल्यावर रुग्ण माघारी फिरत होते. 
जिल्हा रुग्णालयांमध्ये यामुळे मोठी गर्दी झाली होती. ओपीडी सेक्शनमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नेहमीपेक्षा अधीक काळ ओपीडी सुरू ठेवाव्या लागल्या होत्या.
या कारणामुळे बंद
नॅशनल मेडिकल कमिशन बील संसदेत विना चर्चेने पास करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यात अनेक उणीवा आहेत. लोकशाहीविरोधी, भ्रष्टाचाराला चालना देणारे आहे. आयुष डॉक्टरांना मॉर्डन मेडिसीनची प्रॅक्टीस करण्याची मुभा राहणार आहे. खाजगी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी नियम बनविण्यात आले आहेत परिणामी मनमानी वाढणार आहे. यामुळे भारतातील वैद्यकीय व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन हा बंद आयोजित केला होता.
खासदारांना निवेदन
संसदेत हे विधेयक येणार असल्यामुळे खासदार डॉ.हिना गावीत यांना असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे विधेयक पारीत होऊ देवू नये अशी विनंती यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. निवेदन देणा:यांमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, सचिव डॉ.राजेश कोळी, रवींद्र पाटील, डॉ.शिरिष शिंदे, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.विजय पटेल, डॉ.योगेश देसाई, डॉ.दिपक अंधारे, डॉ.विनय पटेल, डॉ.सुनील पाटील, डॉ.प्रसाद सोनार, डॉ.जयंत शहा, डॉ.दिपक पटेल, डॉ.युवराज पाटील, डॉ.वोरा आदी उपस्थित होते.
 

Web Title: The doctor stopped the burns in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.