विरचक धरणाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:18 PM2019-08-06T12:18:10+5:302019-08-06T12:18:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 ...

The doors of the creepy dam opened | विरचक धरणाचे दरवाजे उघडले

विरचक धरणाचे दरवाजे उघडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 मीटर्पयत पाणी पातळी आल्याने पाटबंधारे विभागाने 650 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे धरण झाल्यापासून अद्याप एकदाही पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. जास्तीत जास्त 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. विरचक धरणाची पाणी पातळी क्षमता ही 239 मिटर्पयत आहे. त्यापैकी 236.10 मिटर पातळी सोमवारी दुपारी तीन वाजेर्पयत झाली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून टप्प्याटप्प्याने 650 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होता. 
यामुळे शिवण नदीची पाणी पातळी वाढणार होती. नदी काठावरील विरचक, बिलाडी, खामगाव, सुंदर्दे, करणखेडा, बद्रीङिारा, नवातांडा, भवाली, धुळवद, व्याहूर या गावांच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दवंडी देखील दिली जात आहे.
विरचक प्रकल्पाची निर्मिती साधारणत: 20 वर्षापूर्वी झाली आहे. तेंव्हापासून हे धरण पुर्ण क्षमतेने कधीच भरलेले नाही. एका वर्षी केवळ 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेला होता. त्यानंतर कायम 55 टक्केच्या आतच पाणीसाठा राहिला आहे. गेल्यावर्षी केवळ 29 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून यंदाच्या पावसाळ्यार्पयत पाणी पुरवावे लागले होते. 
दरम्यान, प्रकल्पातील तब्बल 650 क्यूसेक पाणी सोडण्यास नगरपालिकेने अर्थात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आक्षेप घेतला आहे. चार वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे पाणी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर पाऊस झाला नाही. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे  जावे लागले होते. त्यामुळे परिस्थिती पाहून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घ्यावा अशी अपेक्षा आमदार रघुवंशी यांनी केली आहे. 
दरम्यान, आंबेबारा धरण व खोलघर धरण पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी शिवण नदीत येत असून या नदीला मिळणारे इतरही अनेक नाले वाहत असल्याने शिवणचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे विरचक मधील पाणी पातळीत सतत वाढच होत राहणार आहे.  

नंदुरबार तालुक्यातील वसलाई सिंचन प्रकल्पातून दोन ठिकाणी झरे सुरू असल्यामुळे भिती व्यक्त करण्यात आली होती.परंतु प्रकल्पाचे जुने मातीकाम असल्याने पुर्ण क्षमतेने भरल्यावर असे झरे सुरू होतात. त्यामुळे भितीचे कारण नाही असे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाची पहाणी करून धोकेदायक स्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

Web Title: The doors of the creepy dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.