मालमत्तापत्रकासाठी 60 गावांमध्ये ड्रोनद्वारे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:57 AM2019-05-30T11:57:14+5:302019-05-30T11:57:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील गावठाणांच्या  जमिनींचे जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन पालिकांच्या धर्तीवर मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय ...

Drone Surveys in 60 villages for the affidavit | मालमत्तापत्रकासाठी 60 गावांमध्ये ड्रोनद्वारे सव्रेक्षण

मालमत्तापत्रकासाठी 60 गावांमध्ये ड्रोनद्वारे सव्रेक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील गावठाणांच्या  जमिनींचे जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन पालिकांच्या धर्तीवर मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय घेतला गेला आह़े निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्ह्यातील 60 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ड्रोनद्वारे सव्रेक्षण होणार आह़े यातून सिमांकन व गावठाण हद्द समजून येणार आह़े 
शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या सव्रेक्षण कार्यक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार ग्रामीण मालमत्ताधारकांना नमुना आठऐवजी मालमत्तापत्रक मिळण्याचा मार्ग होणार आह़े ग्रामीण भागात नागरिकांच्या स्थावर मालमत्तेला नमुना आठ देऊनही कर्ज घेण्याची सुविधा मिळत नव्हती़ तसेच मिळकतीला योग्य तो मोबदलाही दिला जात नव्हता़ यामुळे शासनाने मालमत्तांचे संरक्षण होऊन सिमांकन निश्चिती करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय घेतला होता़ या निर्णयाची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणी सुरु झाली आह़े यात नंदुरबार जिल्ह्यातील साधारण दोन लाख खातेधारकांना हक्काचे मालमत्तापत्रक मिळणार आह़े ड्रोनद्वारे होणा:या सव्रेक्षणानंतर स्थानिक ग्रामसभा घेण्याचेही निश्चित करण्यात आले आह़े ग्रामसभेतून मोजणी कार्यक्रमाची माहिती दिली जाईल़ 
शासनाकडून होणा:या या मोजणीमुळे शासकीय मिळकतीचे संरक्षण, मिळकतीचा नकाशा व सीमा निश्चिती, मिळकतीच्या नेमक्या छायाचित्राची माहिती, मालकी हक्काचे अभिलेख मिळकत पत्रिका, ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण, गावातील रस्त्यांचे अचूक नकाशे, नाल्यांच्या सीमा निश्चित होणार, अतिक्रमणाला चाप बसणार आणि मिळकत पत्रिकेमुळे घरांवर कर्ज घेणे सुलभ होणार आह़े सव्रेक्षणानंतर देण्यात येणा:या पत्रकामुळे बाजारपेठेत तरलता येऊन गावांची आर्थिक पत उंचावण्यास मदत होणार असल्याचे भूमीअभिलेख विभागाने सांगितले आह़े 

महसुली गावांमध्ये गावठाणाचे ड्रोनद्वारे होणा:या नगर भूमापन मोजणीकरता नंदुरबार जिल्ह्यात 60 गावे प्रस्तावित आहेत़ यात नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, उमर्दे खुर्द, वाघोदे, नळवे खुर्द, धमडाई, पथराई, लोणखेडा, पळाशी, दुधाळे, राकसवाडे, नवापुर तालुक्यातील निंबोणी, नगारे, पिंपळे, कारेघाट, पिंप्राण, निमदर्डा, पानबारा, खोकसा, नांदवण, कासारे, शहादा तालुक्यातील टेंभली, अलखेड, लोहारे, मनरद, सोनवद तर्फे शहादा, औरंगपूर, मोहिदे तर्फे हवेली, मलगाव, मानमोडय़ा, कुकावल, तळोदा तालुक्यातील त:हावद, खेडले, धानोरा, दसवड, रांझणी, सोमावल बुद्रुक, नर्मदानगर, कढेल, आष्टे तर्फे बोरद, उमरी, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई, मक्राणीफळी, मिठय़ाफळी, वाण्याविहिर खुर्द, सोरापाडा, गंगापूर, वाण्याविहिर बुद्रुक, राजमोही मोठी, राजमोही लहान, देवमोगरा नगर तर धडगाव तालुक्यातील तोरणमाळ या एकमेव गावाचा समावेश करण्यात आला आह़े या गावांमध्ये त्या-त्या तालुक्यातील भूमीअभिलेख विभागाचे उपअधिक्षक ड्रोनद्वारे सव्रेक्षण राबवणार आहेत़

सव्रेक्षणांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावात आठ टप्प्यात कामकाज होणार आह़े यात प्रथम गावठाणाची हद्द मोजणी करुन निश्चिती करणे, ग्राउंड कंट्रोल पॉईंट प्रस्थापित करणे, गावातील रस्त्यांचे सिमांकन करणे, ड्रोनद्वारे गावठाणांचे छायाचित्रण करणे, या छायाचित्रांचे प्रोसेसिंग करुन मिळकतीचे नकाशे तयार करणे, नकाशा आधारे हक्क चौकशी काम करणे, नगर भूमापन अभिलेख तयार करणे, मिळकत पत्रिका नकाशे आदी तसेच सनद वाटप करणे आदी अपेक्षित आह़े ग्रामसभा सुरु झाल्यानंतर तात्काळ ही कामे सुरु होतील़ 

Web Title: Drone Surveys in 60 villages for the affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.